मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन वर्षानंतर आले मंत्रालयात, शरद पवार म्हणाले अरे वा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन वर्षांनी मंत्रालयात उपस्थित झाले. कोरोनाच्या काळात म्हणजेच मागची दोन वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरूनच काम करत होते. अधिवेशन काळ सोडला तर ते मंत्रालयात आले नव्हते. मात्र आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात आले त्यांनी मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांशी संवादही साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे.

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जेव्हा आज मंत्रालयात आले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना फुलं वाहून अभिवादन केलं. त्यानंतर मंत्रालयाच्या विविध विभागांमध्ये जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. येत्या वर्षी गुढीपाडव्यापासून राज्यातले निर्बंध पूर्णपणे हटवण्यात आले. मास्कची सक्तीही काढण्यात आली आहे. तसंच राज्यात गुढीपाडव्याचा उत्सवही जोषात आणि जल्लोषात साजरा झाला. आता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील मंत्रालयात आले होते.

कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनेक राजकीय कार्यक्रमांचं उद्घाटन, प्रशासकीय बैठका, कॅबिनेट बैठक हे सगळं व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेत असत. त्यांच्यावर नोव्हेंबर महिन्यात शस्त्रक्रिया झाली त्यानंतरही ते घरूनच काम करत होते. आता ते त्यातूनही बरे झाले आहेत. आज मंत्रालयात त्यांची उपस्थिती होती. याबाबत शरद पवार यांना विचारलं असता त्यांनीही अरे वा म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.

हे वाचलं का?

शरद पवारांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला की मुख्यमंत्री आज मंत्रालयात आहेत. त्यावर शरद पवार म्हणाले आज आले का? अरे वा.. अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या तब्बेतीच्या कारणामुळे ते मंत्रालयात येत नव्हते. मी अनेक राज्यांमध्ये पाहतो मुख्यमंत्री घरी बसूनच निर्णय घेतात. घरीही सचिवालय असतं. तसंच वर्षा या निवासस्थानावरही आहे. त्यामुळे आले नाहीत तरीही राज्याचा कारभार थांबला नाही. राज्याचा कारभार व्यवस्थित सुरू राहिला. त्यांच्याकडे आलेल्या फाईल पूर्ण करतात. त्यामुळे त्याबाबतची चिंता माझ्या मनात नाही असंही शरद पवार यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे हे मंत्रालयात आले याचा मला आनंद आहे. त्यांच्या कामाची सुरूवात सकाळी ७-८ वाजल्यापासूनच होते. मुख्यमंत्री वर्षाच्या बाहेर पडत नाहीत म्हणून त्यांच्यावर खूप आरोप झाले होते. अशात आज मुख्यमंत्री आज मंत्रालयात आले चांगली गोष्ट आहे. अनेकांचे जे मुख्यमंत्र्यांकडे जे प्रश्न आहेत तेदेखील सोडवले जातात असंही शरद पवार यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT