Sakinaka Rape case : ‘काळीमा फासणारे कृत्य’; फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे. खटला फास्ट ट्रॅक चालवला जाईल. मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर […]
ADVERTISEMENT

साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे. खटला फास्ट ट्रॅक चालवला जाईल.
मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.
मुंबईतल्या साकीनाका भागात एका महिलेवर बलात्कार झाला. त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्यात आला तिला मारहाणही करण्यात आली. 9 सप्टेंबरच्या रात्री उशिरा ही घटना साकीनाका भागात घडली. या घटनेने मुंबई हादरली आहे. या बलात्कार पीडित महिलेला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज तिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?










