मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत आणखी कोणी-कोणी घेतली लस?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या या टप्यात आज (11 मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांना कोवँक्सिन लस देण्यात आली.

ADVERTISEMENT

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री मीनाताई पाटणकर आणि उद्धव ठाकरे यांचे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनाही लस देण्यात आली आहे.

यावेळेस मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, डॉ तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे डॉ शशांक जोशी उपस्थित होते

हे वाचलं का?

दरम्यान, लस घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री असं म्हणाले की, ‘मी स्वतः लस घेतली आहे आणि तुमच्यासमोर उभा आहे. मनापासून सांगतो, की लस घेताना कळतसुद्धा नाही एवढ्या छान पद्धतीनं लस दिली जात आहे. कोरोनाचा धोका वाढत आहे. म्हणून मी जनतेला आवाहन करतो, ज्यांना ज्यांना लस घेण्यासाठी पात्र ठरवलेलं आहे,त्यांनी मनात कोणतेही किंतु-परंतु न आणता लस घ्यावी.’

ADVERTISEMENT

…तर पुन्हा कडक लॉकडाऊन लावावा लागेल: मुख्यमंत्री

ADVERTISEMENT

दरम्यान, याचवेळी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबतही भाष्य केलं. याविषयी बोलताना ते असं म्हणाले की, ‘काही दिवसांपासून कोरोना संसर्गात मोठी वाढ होत असून परिस्थिती सुधारली नाही तर आवश्यकतेनुसार काही ठिकाणी नाईलाजाने कडक लॉकडाऊन लावावा लागेल.’

यामुळे आता पुढचे काही दिवस हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. त्यांनी देखील मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयात डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत लस घेतली होती.

कोव्हिशिल्ड ही सीरम इन्स्ट्यिट्यूटने निर्मिती केलेली लस शरद पवार यांना देण्यात आली होती. शरद पवार यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून यासंदर्भातली माहिती दिली होती.

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 1 मार्चला कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT