Maharashtra Unlock चा निर्णय जाहीर केल्यानंतर CM उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
महाराष्ट्रातील कोव्हिड रुग्णांची संख्या कमी झाली असली तरीही मागील अनुभव लक्षात घेता सगळ्यांनी अतिशय काटेकोरपणे आणि काळजी घेऊन वागायचं आहे. प्रत्येकाने स्वतः आरोग्याचे नियम पाळताना आपल्यामुळे इतरांनाही आरोग्याचा कुठला धोका निर्माण होणार नाही हे पाहायचे आहे. आपण निर्बंध शिथील केले असले आणि तिसरी लाट येणार की येणार नाही याचे अंदाज करीत असलो तरी या विषाणूच्या […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील कोव्हिड रुग्णांची संख्या कमी झाली असली तरीही मागील अनुभव लक्षात घेता सगळ्यांनी अतिशय काटेकोरपणे आणि काळजी घेऊन वागायचं आहे. प्रत्येकाने स्वतः आरोग्याचे नियम पाळताना आपल्यामुळे इतरांनाही आरोग्याचा कुठला धोका निर्माण होणार नाही हे पाहायचे आहे. आपण निर्बंध शिथील केले असले आणि तिसरी लाट येणार की येणार नाही याचे अंदाज करीत असलो तरी या विषाणूच्या बदलत्या अवतारापासून आपण सावध राहिलेच पाहिजे. दुसऱ्या लाटेच्या वेळी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे केवळ आपल्याच नव्हे तर देशासमोर कसे आव्हान उभे ठाकले आहे ते अजून ताजे आहे. म्हणूनच यावेळी आम्ही राज्यातील निर्बंध किंवा लॉकडाऊन लावताना ऑक्सिजनची लागणारी गरज हा निकष ठेवला आहे असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंध शिथील करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
आणखी काय म्हणाले आहेत मुख्यमंत्री?
यापुढे राज्यातील कोव्हिड रुग्णांसाठी दररोज 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागू लागला की राज्यात लॉकडाऊन लावला जाईल. आपणास माहीत आहे की, राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता मर्यादित असून दररोज केवळ 1300 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन केले जाते. दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली तसेच ऑक्सिजनची गरजही खूप वाढली होती, त्यामुळे सुमारे 500 मेट्रिक टन ऑक्सिजन अतिशय प्रयत्नपूर्वक इतर राज्यांतून आणावा लागला होता. दररोज 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची कोविड रुग्णांसाठी आवश्यकता भासू लागली की ( सुमारे 30 हजार रुग्णांसाठी) राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.
हे वाचलं का?
गेल्या पावणे दोन वर्षांत कोविडने खूप काही शिकवले आहे. ही लढाई आपण एकत्र मिळून लढतो आहोत, आणि मला खात्री आहे शासनाने दिलेल्या सूचना या सर्वांच्या भल्यासाठीच आहेत हे लक्षात घेऊन आपण सहकार्य कराल.
मी पुन्हा एकदा सांगतो, निर्बंध लावण्यात आम्हाला आनंद नाही. कोव्हिडचा डेल्टा अवतार आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये अमेरिका, ब्रिटनमध्ये सुद्धा परत मोठ्या प्रमाणावर पसरतो आहे. अशा परिस्थितीत आपल्यालाही सगळ्या बाबतीत अतिशय काळजीपूर्वक व्यवहार खुले करावे लागत आहेत. परवा आपण मर्यादित प्रमाणात का होईना पण लोकल प्रवासास मान्यता दिली. आज देखील आपण हॉटेल उपहारगृह, दुकाने यांच्या बाबतीत निर्णय घेतले आहेत. अशात स्वतःची काळजी घ्या आणि स्वयंशिस्त पाळावी असं आवाहन मुख्यमंत्री म्हणून मी करतो आहे. असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
ADVERTISEMENT
इतरही काही क्षेत्रांमधून निर्बंध शिथिल करण्याची मागणी होती आहे, आपण यावर देखील संपूर्ण काळजी घेऊन निर्णय घेऊ
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT