वारकऱ्यांनी तुडुंब भरलेलं पंढरपूर पहायचं आहे ! शासकीय पुजेदरम्यान मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाही महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा सण साजरा होतो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते आज पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली. शासकीय पुजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत आपल्या ताफ्यासोबत पंढरपूरला पोहचले होते.

ADVERTISEMENT

पहाटे २ वाजून १० मिनीटांनी मुख्यमंत्री सपत्नीक मंदीरात पोहचले. या शासकीय पुजेसाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदीर आणि गाभारा आकर्षक फुलांनी सजवलेला होता. अतिशय भक्तीमय वातावरणात शासकीय पुजेला सुरुवात झाली. यंदा मुख्यमंत्र्यांसोबत महापुजेचा मान वर्धा येथील विणेकरी शिवदास कोलते व त्यांच्या पत्नी इंदुबाई कोलते यांना मिळाला होता.

हे वाचलं का?

या पुजेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे राज्यावरचं कोरोनाचं संकट दूर होऊ दे असं साकडं घातलं. एरवी पंढरपूरला वारीच्या निमीत्ताने १० लाखांच्या घरात वारकरी हजेरी लावत असतात. परंतू यंदा कोरोनामुळे पायी वारी सोहळ्याला परवानगी नाकारण्यात आली होती. आषाढीच्या निमीत्ताने वारकऱ्यांनी तुडुंब भरलेलं पंढरपूर आम्हाला पुन्हा एकदा पहायचं आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यावरचं कोरोनाचं संकट दूर व्हावं अशी प्रार्थना केली.

यंदाच्या महापुजेला कोरोनाच्या नियमांमुळे मोजके वारकरी उपस्थित होते. याचसोबत उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणेही या पुजेला हजर होते.

ADVERTISEMENT

पंढरपूरला पोहचताच CM Uddhav Thackeray यांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT