महाराष्ट्रातली महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार, मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातली महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातल्या शाळांपाठोपाठ राज्यातली महाविद्यालयंही बंद असणार आहेत. मुंबईसह राज्यभरात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं सामंत यांनी जाहीर केलं आहे. मुंबईतल्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला होताच. आता मुंबईसह राज्यातील महाविद्यालयंही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत मंगळवारी दहा हजारांपेक्षा जास्त कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले. तसंच राज्यातली संख्याही जास्त होती. आजही ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉन या व्हेरिएंटचे रूग्णही मुंबईत जास्त आहेत. त्यामुळे खबरदारीचे उपाय योजले जात आहेत. तसंच लसीकरणही वाढवण्यावर भर दिला जातो आहे. अशात आता खबरदारीचा उपाय म्हणून पहिली ते नववी पर्यंतच्या शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. त्यांचं ऑनलाईन शिक्षण सुरू असणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोरोना रूग्ण वाढल्याने औरंगाबादमधल्या पहिली ते आठवीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद

आणखी काय म्हणाले उदय सामंत?

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या मतांनुसार विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या जसे की विजेची अनुपलब्धता, नेटवर्क नसणे. विद्यार्थी किंवा त्याचं कुटुंब कोव्हिडबाधित असले तर संबंधित विद्यार्थी परीक्षा देऊ शकला नाही तर त्या विद्यार्थ्याला ऑनलाईन परीक्षा दण्याची संधी देण्यात यावी.

ADVERTISEMENT

गोंडवाना विद्यापीठ, जळगाव विद्यापीठ आणि नांदेड विद्यापीठाशी संलग्न असलेल्या काही भागात नेटवर्क सेवा विस्कळीत झाल्यास किंवा उपलब्ध नसल्यास जिल्हाधिकाऱ्यांची संमती घेऊन या भागात विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा घेता येईल असे नियोजन कऱण्यात यावं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT