कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा, मित्रांनी केली पनकी मंदिरात पूजा-अर्चना
सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav) यांच्या प्रकृतीत (Health Update) सुधारणा झाली आहे. ५ सप्टेंबरला त्यांच्या शरीराची हालचाल होऊ लागली होती. राजू श्रीवास्तव त्यांच्या पत्नीशी (Raju Shrivastav Wife) बोलण्याचा प्रयत्न करत होते. आता त्यांच्या मित्रांनी (Raju Shrivastav Friends) त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून कानपूरच्या पनकी मंदिरात पूजा-अर्चा केली. राजू श्रीवास्तव यांच्या चांगल्या आरोग्यासाठी पूजा आणि […]
ADVERTISEMENT
सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav) यांच्या प्रकृतीत (Health Update) सुधारणा झाली आहे. ५ सप्टेंबरला त्यांच्या शरीराची हालचाल होऊ लागली होती. राजू श्रीवास्तव त्यांच्या पत्नीशी (Raju Shrivastav Wife) बोलण्याचा प्रयत्न करत होते. आता त्यांच्या मित्रांनी (Raju Shrivastav Friends) त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून कानपूरच्या पनकी मंदिरात पूजा-अर्चा केली.
ADVERTISEMENT
राजू श्रीवास्तव यांच्या चांगल्या आरोग्यासाठी पूजा आणि प्रार्थना
कानपूरच्या पनकी मंदिरात राजू श्रीवास्तव यांच्या मित्रांनी पूजा आणि प्रार्थना केली. राजू श्रीवास्तव यांना आराम पडावा आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून राजू श्रीवास्तव यांचे सल्लागार अजित सक्सेना हेदेखील पनकी मंदिरात आले होते. अजित यांनी भगवान हनुमान यांचं दर्शन घेतलं आणि राजू श्रीवास्तव यांना लवकर आराम पडावा म्हणून प्रार्थना केली.
अजित यांच्यासह राजू श्रीवास्तव यांचे खास मित्र संजय कपूर हेदेखील मंदिरात पोहचले होते. संजय यांनीही राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. डॉक्टरांचं म्हणणं आहे की राजू श्रीवास्तव हे आता व्हेंटीलेटरवर आहेत. ते व्हेंटीलेटरवर आहेत तोपर्यंत त्यांच्या प्रकृतीबाबत आत्ताच निश्चितपणे काही सांगणं कठीण आहे असं म्हटलं आहे.
हे वाचलं का?
डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांच्याबाबत काय म्हटलं आहे?
जोपर्यंत राजू श्रीवास्तव हे व्हेंटीलेटरवर आहेत तोपर्यंत त्यांच्या प्रकृतीबाबत काहीही निश्चितपणे सांगता येणार नाही. जर राजू श्रीवास्तव हे व्हेंटीलेटर सपोर्टमधून बाहेर येऊ शकले तर त्यांच्या प्रकृतीबाबत काही सांगता येईल. संजय यांनी राजू यांच्याबाबत सांगितलं की राजू माझ्या घराजवळच राहायचे. माझं बालपण त्यांच्यासोबत गेलं आहे.
संजय कपूर यांनी सांगितलं की राजू यांचे भाऊ दीपू हे आजच मुंबईला परतले आहेत. तर त्यांचे मेहुणे आशिष हे लखनऊ मध्ये आले आहेत. माझी पत्नी आणि मुलगा-मुलगी दोघे राजू श्रीवास्तव यांच्यासोबतच आहेत.
ADVERTISEMENT
फक्त पत्नीला राजूला भेटण्याची परवानगी
अजित सक्सेना म्हणतात की, राजू श्रीवास्तव यांना २८ दिवस झाले आहेत. संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून फक्त त्यांच्या पत्नीला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्या येऊन सांगतात की राजूजी तिच्या हाताला स्पर्श करतात, डोळे उघडतात आणि पाहतात. हातपाय हलवून ते लवकर बरे होतील हे सांगण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत राजू लवकरच आपल्यात असतील, असे आम्हा सर्वांना वाटते, कारण राजूची प्रकृती हळूहळू सुधारत आहे, असं अजित म्हणाले.
ADVERTISEMENT
२८ दिवसांपासून आहेत रुग्णालयात
राजू श्रीवास्तव १० ऑगस्टपासून एम्समध्ये दाखल आहेत. ते हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि त्यानंतर ते खाली पडले. राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या जिम ट्रेनरने तातडीने रुग्णालयात नेले. तेव्हापासून राजू दिल्लीच्या एम्समध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. आता हळूहळू राजूच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT