अभिनेत्री Swara Bhasker विरोधात Pune पोलिसात तक्रार, ‘ते’ Tweet पडणार महागात?

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिने केलेल्या एका ट्विटमुळे ती आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण पुणे पोलिसात (Pune Police) तिच्याविरोधात कलम 153 अ आणि 295 अ नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे. हिंदूंची (Hindu) तुलना तालिबान्यांशी (Taliban) करुन जाती-पातीत तेढ निर्माण केल्याच्या आरोप करत पुण्यातील वकील विजय राठोड यांनी स्वरा भास्कर हिच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी फरासखाना पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.

स्वरा भास्करविरोधात नेमकी तक्रार काय?

स्वरा भास्कर हिने 16 ऑगस्ट रोजी एक ट्विट केलं होतं. हे ट्विट हिंदुत्वविरोधी असल्याचं म्हणत पुण्यातील वकील विजय राठोड यांनी स्वरा भास्करविरोधात तक्रार दाखल केली. पाहा त्यांनी आपल्या तक्रारीत नेमकं काय म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विषय अभिनेत्री स्वरा भास्कर हिने तिचे ट्वीटर खाते Swara Bhasker @ ReallySwara या खात्यावरून जाणूनबुजून प्रक्षोभक लिखाण प्रसिद्ध करून हिंदू समाजाबाबत जातीय तेढविद्वेष वाढून समाजाची बदनामी केल्याने तीचेवर भारतीय दंड विधान कायदा कलम १५३अ २९५ अ नुसार कायदेशीर कारवाई करणेबाबत तक्रार.

1. स्वरा भास्कर ही हिंदी चित्रपट सृष्टी तील अभिनेत्री आहे. तिचे Swara Bhasker @ReallySwara या नावाने ट्विटर खाते असून स्वत:ची मते ती या खात्यातून जाहीरपणे प्रसिद्ध करीत असते.

ADVERTISEMENT

2. सदर स्वरा भास्कर हिने याआधी सुद्धा दि. 3 ऑगस्ट 2021 रोजी जाती-जातीमध्ये द्वेष पसरेल असे ट्विट तिच्या खात्यावरून प्रसिद्ध केले आहे.

ADVERTISEMENT

3. ेच दि. 16 ऑगस्ट 2021 रोजी तिने अफगानिस्तान येथील अतिरेकी तालिबान संगठन यांचा हिंदुत्वाशी संबंध जोडून हिंदूबद्दल ते जहाल आहेत असे आशयाचे ट्विट प्रसिद्ध केले आहे. सदर ट्विट वाचले असता हिंदूची आणि तालिबानी अतिरेकी यांची एकच विकृत मानसिकता आहे. असं तिने म्हटलं आहे.

आपण हिंदूच्या जहाल वागणुकीबद्दल गप्प बसण्याचे टाळू नये. यावरून तिला हिंदू आणि अफगाणी तालिबानी यांची वागणूक एकसमान असल्याचे सूचित करावयाचे आहे हेच स्पष्ट होत आहे.

वास्तविक तालिबानी हे लोकशाही मानीत नाहीत. ते जहाल कट्टरवादी आहेत तसेच ते जनतेच्या मुलभूत हक्कांचे रक्षण करीत नाहीत. परंतु अशा प्रकारचे जाणूनबुजून प्रक्षोभक लिखाण प्रसिद्ध करण्यामुळे हिंदू समाजाबद्दल इतर समाजामध्ये गैरसमज पसरू शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे सामाजिक सलोख्याचे वातावरण बदलून सर्व समाजात जातीय विद्वेष पसरत आहे.

‘देशात मूर्ख लोकांची कमी नाहीये’…व्हायरल व्हीडिओवर स्वरा भास्कर संतापली

सदर ट्वीट अकारण हिंदू समाजाबाबत इतर समाजाचे गैरसमज निर्माण झालेला आहे. स्वरा भास्कर हिचे सदर लिखाण कारणीभूत ठरलेले आहे. आज सुद्धा सदर प्रक्षोभक ट्विट तिच्य ट्विटर खात्यावर दिसत आहे. सबब स्वरा भास्करवर भारतीय दंड विधान कायदा कलम 153 अ, 295 अ नुसार गुन्हा नोंदविण्यात यावा.

दरम्यान, आता याप्रकरणी तक्रार नोंदविण्यात आली असून पुणे पोलीस नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT