“राहुल गांधी पार्ट टाइम राजकारणी” गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यातले दहा ठळक मुद्दे
काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासहीत सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. G23 मध्ये सहभागी असलेले गुलाम नबी आझाद यांनी पाच पानी पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलं आहे. सध्याचं काँग्रेस रिमोटवर चालणारं आहे असंही त्यांनी यात म्हटलं आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जातो आहे. गुलाम […]
ADVERTISEMENT
काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासहीत सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. G23 मध्ये सहभागी असलेले गुलाम नबी आझाद यांनी पाच पानी पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलं आहे. सध्याचं काँग्रेस रिमोटवर चालणारं आहे असंही त्यांनी यात म्हटलं आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जातो आहे.
ADVERTISEMENT
गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्याच्या पत्रातले ठळक दहा मुद्दे काय आहेत?
१) गुलाम नबी आझाद यांनी आपल्या राजीनाम्याच्या पाच पानी पत्रात राहुल गांधी यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी हे त्यांच्या जवळपास गैर अनुभवी लोकांना बाळगून आहेत त्यांनी वरिष्ठ नेत्यांना साईडलाईन केलं आहे अशी गंभीर तक्रार आझाद यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्यावर आधीही पार्टटाइम राजकारणी असल्याचा आरोप लागला आहे. आता आझाद यांच्या पत्रातही राहुल गांधींना टार्गेट करण्यात आलं आहे.
२) काँग्रेसने अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला चालवणाऱ्या राष्ट्रीय कार्यसमितीने इच्छाशक्ती आणि क्षमता दोन्ही हरवलं आहे
हे वाचलं का?
३) काँग्रेसने भारत जोडो यात्रा सुरू केली आहे मात्र काँग्रेसला आधी काँग्रेस जोडो यात्रा सुरू करण्याची गरज होती.
४) राहुल गांधी हे राजकारणात आल्यांतर त्यांना पक्षाचं उपाध्यक्षपद देण्यात आलं होतं. त्यांनी काँग्रेसच्या काम करण्याची पद्धती आणि परंपरा संपवल्या. त्यांच्या सगळ्या सल्लागारांनी मिळून हे काम केलं. युपीएची सत्ता असताना पंतप्रधानपदी मनमोहन सिंह होते. त्यांनी दिलेला अध्यादेश फाडून टाकणं हे राहुल गांधींची अपरिपक्वता दाखवणारं वर्तन होतं.
ADVERTISEMENT
५) काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक का घेतली जात नाही? हा प्रश्नही गुलाम नबी आझाद यांनी विचारला आहे.
ADVERTISEMENT
गुलाम नबी आझाद यांच्या पत्रात ग्रुप २३ चाही उल्लेख
६) या पत्रात गुलाम नबी आझाद यांनी G23 चा उल्लेखही केला आहे. जी २३ च्या नेत्यांनी जेव्हा काँग्रेस पक्षात असलेल्या कमकुवत बाबी सांगितल्या तेव्हा त्यांचा वारंवार अपमान करण्यात आला.
७) राहुल गांधी काँग्रेसमध्ये आल्याने काँग्रेसमधली चर्चेची परंपरा संपुष्टात आली. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि राहुल गांधी यांनी तडकाफडकी अध्यक्षपद सोडलं. त्यांनंतर CWC ने तुम्हाला अंतरिम अध्यक्ष केलं. मात्र तुम्ही मागच्या तीन वर्षांपासून अंतरिम अध्यक्षपदी विराजमान आहात.
८) आजच्या घडीची काँग्रेस रिमोटवर चालणारा पक्ष झाला आहे. राहुल गांधी यांचे पीए आणि सुरक्षा रक्षक पक्षाबाबत निर्णय़ घेत आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात आत्तापर्यंत ४९ पैकी ३९ विधानसभा निवडणुका पक्ष हरला आहे.
९) पुढे आझाद असं म्हणतात की काँग्रेसवर इतकी वाईट वेळ आली आहे की नेतृत्वाची धुरा सांभाळण्यासाठी प्रॉक्सीचा आधार घेतला जातो आहे. काँग्रेसला बिगर गांधी घराण्याचा अध्यक्ष मिळाला तरीही तो कठपुतलीसारखाच असेल यात काही शंका नाही.
१०) आम्ही आमचं संपूर्ण आयुष्य काँग्रेसला समर्पित केलं. त्या आदर्शांवरच आमची वाटचाल असेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT