के. चंद्रशेखर राव यांनी घेतली ठाकरे-पवारांची भेट; नाना पटोले म्हणतात…

मुंबई तक

देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुका होत असतानाच रविवारी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. भेटीनंतर तिन्ही नेत्यांनी भाजपविरोधात पर्याय देण्याबद्दल भाष्य केलं. दरम्यान, केसीआर आणि पवार-ठाकरे यांच्यातील भेटीबद्दल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भूमिका मांडली. “तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुका होत असतानाच रविवारी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. भेटीनंतर तिन्ही नेत्यांनी भाजपविरोधात पर्याय देण्याबद्दल भाष्य केलं. दरम्यान, केसीआर आणि पवार-ठाकरे यांच्यातील भेटीबद्दल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भूमिका मांडली.

“तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपविरोधी आघाडी बनवण्यासाठी महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. भाजपचा खरा चेहरा त्यांच्या लक्षात आला असून, भाजपच्या हुकुमशाही विरोधात प्रादेशिक पक्षांना एकत्रित आणण्याचा त्यांचा प्रयत्न स्वागतार्ह आहे. पण काँग्रेसशिवाय भाजपविरोधातील आघाडी पूर्ण आणि यशस्वी होणार नाही”, असं नाना पटोले यांनी म्हणाले आहेत.

…तर त्यांना भोगावं लागेल; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर केसीआर यांचा भाजपला इशारा

“केंद्रातील भाजप सरकार हुकुमशाही वृत्तीनं वागत आहे. संविधान, लोकशाही संपवण्याचं आणि देशाची मालमत्ता विकण्याचं काम सुरु आहे. भाजप विरोधकांसोबतच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करणाऱ्या मित्र पक्षांनाही संपवत आहे. याचा अनेक पक्षांना अनुभव आल्यानं ते पक्ष आता भाजपपासून दुरावले आहेत.”