कंगनासारख्या पद्मश्री घेणाऱ्या लोकांची मला लाज वाटते – खासदार रजनी पाटील

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पद्मश्री पुरस्कार स्विकारल्यानंतर कंगना रणौतने वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवरुन सध्या देशभरात चांगलाच गदारोळ माजला आहे. काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनी पाटील यांनीही कंगना रणौतवर खरमरीत टीका केली आहे. कंगनासारख्या पद्मश्री पुरस्कार घेणाऱ्या लोकांची मला लाज वाटते. त्यांना CDCN Act नुसार कारवाई करुन जेलमध्ये टाकलं पाहिजे अशी मागणी रजनी पाटील यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

ज्यांना लाखो स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानातून मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक वाटतं अशा लोकांना अटक करुन जेलमध्ये टाकलं पाहिजे. मला त्या व्यक्तीचं नाव घ्यायला सुद्धा शरम येतेय. मला खरंच त्या व्यक्तीच्या अकलेची कीव करावीशी वाटते. माझे आई-वडील स्वातंत्रसैनिक आहेत. माझे आजोबा वयाच्या २६ व्या वर्षी या देशासाठी लढताना फासावर चढले होते. जर अशा लोकांच्या बलिदानाला कमी लेखलं जात असेल तर त्यांच्या बुद्धीला काय म्हणावं, अशी खरमरीत टीका रजनी पाटील यांनी केली आहे.

कंगनाच्या वक्तव्यावरुन सध्या देशभरात चांगलाच गदारोळ माजला आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही कंगनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेतकऱ्यांवर टीका केली होती. अन्नदात्या शेतकऱ्याला रस्त्यावरील लोकं म्हणून कंगनाने बौद्धिक दिवाळखोरी दाखवून दिल्याचं रजनी पाटील म्हणाल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT