काँग्रेसला बिगर गांधी घराण्याचा अध्यक्ष मिळणार? अशोक गेहलोत यांची का होतेय चर्चा?
काँग्रेस आणि गांधी नातं स्वातंत्र्य पूर्व काळापासूनच आहे हे आपल्याला माहित आहे. गांधी परिवार आणि काँग्रेस यांचं नातं म्हणजे पाण्यात विरघळलेल्या साखरेसारखं. इंदिरा गांधी या आपल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी हे देशाचे पंतप्रधान झाले. राजीव गांधी यांचीही हत्या करण्यात आली. या हत्येनंतर काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळली ती सोनिया […]
ADVERTISEMENT

काँग्रेस आणि गांधी नातं स्वातंत्र्य पूर्व काळापासूनच आहे हे आपल्याला माहित आहे. गांधी परिवार आणि काँग्रेस यांचं नातं म्हणजे पाण्यात विरघळलेल्या साखरेसारखं. इंदिरा गांधी या आपल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी हे देशाचे पंतप्रधान झाले. राजीव गांधी यांचीही हत्या करण्यात आली. या हत्येनंतर काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळली ती सोनिया गांधी यांनी. पण, आता काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांचं नाव चर्चेत आलंय.
सोनिया गांधी विदेशी असल्याचा मुद्दाही चांगलाच गाजला होता. मात्र त्यांच्या कार्यकाळात दोनदा यूपीएची सत्ता आली. सोनिया गांधीनंतर हे पद आलं राहुल गांधी यांच्याकडे. राहुल गांधी यांच्याकडे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणूनही पाहिलं गेलं. पण राहुल गांधी हे सोनिया गांधी किंवा राजीव गांधी यांच्यासारखा करीश्मा दाखवू शकले नाहीत. आता अशोक गेहलोत हे काँग्रेसचे अध्यक्ष होतील अशा चर्चा आहेत. असं घडलं तर अनेक वर्षांनी पहिल्यांदाच काँग्रेसला बिगर गांधी घराण्याचा अध्यक्ष मिळू शकतो.
काँग्रेसचा अध्यक्ष बिगर गांधी घराण्याचा होणार?
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. नुकतीच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे अशोक गेहलोत यांच्या रूपाने काँग्रेसला बिगर गांधी घरण्याचा अध्यक्ष मिळणार ही चर्चा रंगली आहे. राहुल गांधी ही जबाबदारी पुन्हा एकदा आपल्या खांद्यावर घेण्यास तयार नाहीत. तर सोनिया गांधी यांनाही प्रकृतीच्या कारणामुळे ही जबाबदारी नको आहे. सोनिया गांधी बुधवारी उपचारांसाठी विदेशात जाणार आहेत. अशात त्याआधी त्यांनी अशोक गेहलोत यांची भेट घेणं सूचक मानलं जातं आहे.
अशोक गेहलोत यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
ऱाजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधींची भेट घेतली त्यानंतर या चर्चा सुरू झाल्या आहेत. सोनिया गांधी आणि अशोक गेहलोत यांची भेट झाल्यानंतर या भेटीत अशोक गेहलोत यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारवं असा आग्रह धरल्याचं समजतं आहे. मात्र अशोक गेहलोत यांचं म्हणणं आहे की या सगळ्या चर्चा मला प्रसारमाध्यमांकडून समजत आहेत. पक्षाने मला गुजरात निवडणुकीच्या दृष्टीने प्रभारी नेमलं आहे मी ती जबाबदारी पार पाडतो आहे असंही त्यांचं म्हणणं आहे.