चित्रा वाघ यांनी शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओबाबत नाना पटोलेंनी अखेर सोडलं मौन, सांगितलं कारण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

-योगेश पांडे, नागपूर

ADVERTISEMENT

व्हिडिओची काँग्रेसचा आयटी सेल आणि विधी विभाग पडताळणी करत आहे. बदनामी केल्याप्रकरणी आम्ही न्यायालयामध्ये दाद मागणार, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. नागपुरात पत्रकारांशी ते बोलत होते. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी काही फोटो असणारा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओत महिलेसोबत काँग्रेस प्रदेशध्यक्ष नाना पटोले असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्यावर आता टीका होत आहे. सोशल मीडियावर देखील उलट- सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. अशा पद्धतीने व्हिडिओ टाकला पाहिजे का? यावर देखील चर्चा होत आहेत.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नाना पटोलेंबाबत काय ट्विट केलं होतं?

‘काय नाना तुम्ही पण झाडी, डोंगर आणि हाटीलित’ असं व्हिडिओला चित्रा वाघ यांनी कॅपशन दिला आहे. तो व्हिडिओ आता नाना पटोले यांच्या नावाने मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे. या सगळ्या प्रकरणावर नाना यांनी नागपुरात आपली प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राचे राजकारण एका वेगळ्या स्तरावर गेलेले आहे. विरोधकांना संपवण्यासाठी त्यांची बदनामी केली जात आहे. बहुजन नेतृत्व मोठे होऊ नये ते संपण्यासाठीच हे कटकारस्थान असल्याचं नानांनी सांगितलं.

हे वाचलं का?

पुढे बोलताना नाना म्हणाले की, या आधी देखील माझी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळेस देखील माझ्या कुटुंबाला त्रासाचा सामना करावा लागला होता. काँग्रेस पक्षाचं विधी न्याय विभाग व आयटी सेल याबाबत सगळी माहिती गोळा करत आहे. प्रसंगी आम्ही याबाबत न्यायालयात जाणार असल्याचं महत्वपूर्ण विधान नानांनी केला आहे. चर्चा आणि सफलता ज्या माणसाच्या मागे असते त्याला अशा प्रश्नाला सामोरे जावे लागते, असं देखील नाना म्हणाले.

महाराष्ट्रात बहुजनाचा नेतृत्व उगवत असताना अशा परीक्षा द्याव्या लागतात. त्यामुळे कोण काय बोलत आहे यावर मी काही बोलणार नाही, असं म्हणत नानांनी अधिक बोलणे टाळले. त्याचरोबर त्यांच्याविरोधात षडयंत्र रचण्यात येत असल्याचा दावा देखील नानांनी केलाय. माझा या घटनेशी सबंध नाही, असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता हे प्रकरण कोणत्या वळणावर जाऊन थांबते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. नानाच्या प्रत्युत्तरानंतर ज्यांनी नानांवर आरोप केलेत त्या चित्रा वाघ काय भूमिका घेतात याकडे देखील लक्ष राहणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT