आज उभे राहिलो नाही तर देश वाचणार नाही : राहुल गांधींचा महागाईविरोधात एल्गार
दिल्ली : देशातील सर्व यंत्रणा दबावाखाली आहेत. विरोधी पक्षांना बोलू दिले जात नाही. मी आता ईडीला घाबरत नाही. मला चौकशीसाठी कितीही वेळा बोलवा. पण आज उभे राहिलो नाही तर हा देश वाचणार नाही, काँग्रेसचा कार्यकर्ता देशाला वाचवू शकतो. केवळ काँग्रेसच देशाला प्रगती पथावर आणू शकते, अशा शब्दात काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान […]
ADVERTISEMENT

दिल्ली : देशातील सर्व यंत्रणा दबावाखाली आहेत. विरोधी पक्षांना बोलू दिले जात नाही. मी आता ईडीला घाबरत नाही. मला चौकशीसाठी कितीही वेळा बोलवा. पण आज उभे राहिलो नाही तर हा देश वाचणार नाही, काँग्रेसचा कार्यकर्ता देशाला वाचवू शकतो. केवळ काँग्रेसच देशाला प्रगती पथावर आणू शकते, अशा शब्दात काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्ला केला.
वाढत्या महागाई आणि बेरोजगारीवरून आज काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दिल्लीतील रामलीला मैदानावर रॅली काढली. ‘महागाई पर हल्ला बोल’ असे या रॅलीचे नाव आहे. या रॅलीवेळी झालेल्या सभेमध्ये राहुल गांधी बोलत होते.
दुकानात PM मोदींचा फोटो का नाही? निर्मला सितारमन जिल्हाधिकारी पाटील यांच्यावर भडकल्या!
देशात द्वेष वाढत आहे : राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले, जो घाबरतो त्याच्यामध्ये द्वेष निर्माण होतो. भारतात द्वेष वाढत आहे. भारतात भीती वाढत आहे. देशाचं भविष्य भीतीच्या सावटाखाली आहे. महागाई, बेरोजगारीची भीती वाढत आहे. द्वेषाने देश कमकुवत होतोय. भाजप आणि आरएसएसचे नेते देशाचे विभाजन करून जाणीवपूर्वक देशात भीती निर्माण करत आहेत. ते लोकांना घाबरवतात आणि द्वेष निर्माण करतात.