Nana Patole: काँग्रेस सत्तेत कायम राहणार, नंतर स्वबळावर लढणार, पाहा नाना पटोले नेमकं काय म्हणाले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनीष जोग, जळगाव

ADVERTISEMENT

‘आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, हा शब्द आम्ही दिला आहे. त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार नाही.’ काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा अशा स्वरुपाचं वक्तव्य केलं आहे. पण याचवेळी काँग्रेस सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचंही स्पष्ट झालं आहे.

कारण नाना पटोले पुढे असंही म्हणाले आहेत की, ‘निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही.’ याचाच अर्थ पुढील तीन वर्ष सत्तेत कायम राहण्याचा काँग्रेसचा सध्या तरी मानस आहे.

हे वाचलं का?

‘Maharashtra Assembly Elections स्वबळावर लढणार, हायकमांडने सांगितल्यास मी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त केलेल्या भाषणात काँग्रेसला स्वबळावरुन खडे बोल सुनावले होते. मात्र, असं असताना आज (23 जून) पुन्हा एकदा नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा केली आहे. जळगावमध्ये (Jalgaon) पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी पुन्हा एकदा तेच विधान केलं आहे.

ADVERTISEMENT

नेमकं काय म्हणाले नाना पटोले?

ADVERTISEMENT

‘आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार हा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार नाही. निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही.’ असं नाना पटोले यावेळी म्हणाले आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र असं असताना देखील पुन्हा-पुन्हा काँग्रेसकडून स्वबळाची घोषणा केली जात आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्या भूमिकेपाठी दिल्ली हायकमांडचा पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण या सगळ्या घडामोडीमुळे महाविकास आघाडीत अधिक धुसफूस होण्याची दाट शक्यता आहे.

आम्हाला एकटं लढू द्या, मग बघू कोणात किती दम ! नाना पटोलेंनंतर भाई जगतापांकडूनही स्वबळाचा नारा

‘कोणी तिसरी आघाडी काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फायदा मोदींनाच होईल’

दरम्यान, यावेळी नाना पटोले यांना शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीबाबत जेव्हा विचारणा करण्यात आली तेव्हा ते असं म्हणाले की, ‘भाजपच्या विरोधात कोणत्याही प्रकारची आघाडी काँग्रेसशिवाय होऊच शकत नाही.’

‘काँग्रेस पक्ष हा यूपीएचे हृदय आहे. जर कोणताही विरोधी पक्ष तिसरी आघाडी काढायला गेला तर त्याचा सरळ फायदा भाजपला होईल. हे आता सर्वांना कळलं आहे. त्यामुळे काँग्रेसला सोडून अशी तिसरी आघाडी होणार नाही. असे मला वाटते.’ असं म्हणत नाना पटोले यांनी एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसला टोलाच लगावला आहे.

ओबीसी आरक्षणवरुन देवेंद्र फडणवीसांवर टीका

‘ओबीसी आरक्षण हटविण्याचे पाप हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे आहे. आता तेच जनतेची दिशाभूल करत आहेत. ओबीसी आरक्षण परत मिळवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे.’ असं म्हणत यावेळी नाना पटोले यांनी ओबीसींचं राजकीय आरक्षण हटविण्याप्रकरणी फडणवीसांवरच टीकेची झोड उठवली आहे.

भाजपला थांबवण्यासाठी सत्तेत, आम्ही पर्मनंट मेंबर नाही – नाना पटोलेंकडून स्वबळाचा नारा कायम

‘केंद्र सरकारविरोधात रान पेटवणार’

नाना पटोले हे सध्या जळगाव दौऱ्यावर असून त्यांनी इथे भाजपविरोधात रान पेटवणार असल्याचं म्हटलं आहे. याचवेळी नाना पटोलेंच्या उपस्थितीत केंद्र सरकारने पारित केलेल्या नवीन कृषी कायद्याच्या मसुद्याची केली होळी करण्यात आली. नवीन कृषी कायद्यामुळे शेतकरी वर्ग रस्त्यावर येणार आहे. त्यामुळे यापुढच्या काळात भाजप सरकार विरोधात रान पेटवणार असल्याची घोषणा देखील नाना पटोले यांनी केली आहे.

‘वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळली असून केंद्र सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी असते. अराजकता माजवण्यासाठी नव्हे.’ असं म्हणत नाना पटोलेंनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT