चिंता वाढली! दक्षिण अफ्रिकेतून भारतात आलेले दोघे पॉझिटिव्ह, नव्या व्हेरिएंटची धास्ती
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे. साऊथ अफ्रिकेतून आलेल्या 94 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यापैकी दोन जण पॉझिटिव्ह आले आहेत. या दोघांच्या नमुन्यांमध्ये कोणता व्हेरिएंट आहे हे अद्याप समजलेलं नाही मात्र या दोघांचेही नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. दक्षिण अफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या सगळ्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी दोघे पॉझिटिव्ह आले […]
ADVERTISEMENT

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे. साऊथ अफ्रिकेतून आलेल्या 94 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यापैकी दोन जण पॉझिटिव्ह आले आहेत. या दोघांच्या नमुन्यांमध्ये कोणता व्हेरिएंट आहे हे अद्याप समजलेलं नाही मात्र या दोघांचेही नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. दक्षिण अफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या सगळ्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी दोघे पॉझिटिव्ह आले आहेत.
या दोघांचे प्रयोगशाळा नमुने आता या चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत की नेमका हा कोणता व्हेरिएंट आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात खळबळ असतानाच हे वृत्त समोर आलं आहे. बंगळूरुच्या केम्पेगौडा विमानतळावर शनिवारी (27 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेतून विमान आले. या विमानात 594 प्रवासी होते. त्यापैकी दोन दक्षिण आफ्रिकेचे नागरिक कोरोनाबाधित आढळले आहेत.

बंगळूरूचे आयुक्त के. श्रीनिवास म्हणाले, दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन नागरिक कोरोनाबाधित आढळले आहेत. परंतु ओमेक्रॉन स्ट्रेनबाबत अहवाल आल्यानंतरच माहिती मिळेल. विमानात 594 प्रवासी होते त्यापैकी 94 प्रवासी हे दक्षिण आफ्रिकेतून आलेले प्रवासी आहेत. सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली असून या सर्व रुग्णांना ‘आयसोलेशन’मध्ये ठेवण्यात आलंय. तसंच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आलंय. अजूनही काही प्रवाशांची माहिती घेणं सुरू आहे.









