कोरोना चाचणीचे दर आता आणखी कमी.. जाणून घ्या काय आहेत नवे दर?
राज्यातील खासगी प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा बदलण्यात आले आहेत. आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रूपये आकारण्यात येणार आहेत. यासोबतच रॅपिड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दरही कमी करण्यात आले आहेत. अँटीजेन टेस्ट आता १५० रूपयात करण्यात येणार आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केली. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णयही […]
ADVERTISEMENT
राज्यातील खासगी प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा बदलण्यात आले आहेत. आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रूपये आकारण्यात येणार आहेत. यासोबतच रॅपिड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दरही कमी करण्यात आले आहेत. अँटीजेन टेस्ट आता १५० रूपयात करण्यात येणार आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केली. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णयही जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षभरापासून आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आत्तापर्यंत किमान पाच ते सहावेळा दरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. ४ हजार ५०० रूपयांवर असलेले दर वर्षभरात ५०० रूपयांवर आले आहेत.
ADVERTISEMENT
राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहे.
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 31, 2021
महाराष्ट्रात कोरोना आता दहापट वेगाने पसरतोय
राज्य शासनाने सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये सुधारणा केल्या आहेत. आधी दर १२०० रूपयांवर त्यानंतर ९८० रूपयांवर तसंच त्यानंतर ७०० रूपयांवर आणले होते. आज निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार ५००, ६०० आणि ८०० असे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरून नमुना घेऊन त्याची वाहतूक आणि अहवाल देणं या बाबींसाठी रूग्णाकडून ५०० रूपये आकारले जातील. रूग्णालय, कोव्हिड केअर सेंटर, क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून नमुना तपासणी आणि अहवाल यासाठी ६०० रूपये तर रूग्णाच्या निवासस्थानावरून नमुना घेऊन त्याचा अहवाल देणं यासाठी ८०० रूपये दर आकारण्यात येणार आहे. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपक्षा जास्त दर आकारता येणार नाही असंही आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी नमूद केलं आहे.
हे वाचलं का?
राज्यात निर्बंध अधिक कडक करणार, नियोजन सुरू आहे – राजेश टोपे
आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. हे दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित नमूने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जावून नमूने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत. अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी २५०, ३०० आणि ४०० असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी ३५०, ४५०, ५५० असे दर निश्चित करण्यात आले आहेत. रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास १५०, २०० आणि ३०० असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT