अडचणी राज ठाकरेंची पाठ सोडेनात, परळी न्यायालयाचं राज यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापाठीमागील अडचणी काहीकेल्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीयेत. औरंगाबाद येथील सभेत केलेल्या प्रक्षोभक विधानाप्रकरणी राज यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असतानाच आता बीड जिल्ह्यातील परळी न्यायालयाने राज यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जाहीर केलं आहे. 2008 साली राज ठाकरेंविरुद्ध झालेल्या कारवाईविरुद्ध परळी शहरात मनसे समर्थकांनी परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक केली होती. या प्रकरणात […]
ADVERTISEMENT
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापाठीमागील अडचणी काहीकेल्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीयेत. औरंगाबाद येथील सभेत केलेल्या प्रक्षोभक विधानाप्रकरणी राज यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असतानाच आता बीड जिल्ह्यातील परळी न्यायालयाने राज यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जाहीर केलं आहे.
ADVERTISEMENT
2008 साली राज ठाकरेंविरुद्ध झालेल्या कारवाईविरुद्ध परळी शहरात मनसे समर्थकांनी परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक केली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं. यात राज ठाकरेंना सुनावणीसाठी परळी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
परंतू राज ठाकरे अद्याप या सुनावणीला एकदाही हजर राहिले नाहीत. जामीन मिळाल्यानंतरही सातत्याने सुनावणीला गैरहजर राहिल्यामुळे अखेरीस कोर्टाने हे वॉरंट जारी केलं आहे. यापूर्वी 10 फेब्रुवारीला कोर्टाने अटक वॉरंट काढले होते आणि 13 एप्रिल पर्यंत कोर्टात हजर राण्या संदर्भात सांगितले होते मात्र राज ठाकरे हे 13 एप्रिलपर्यंत कोर्टात हजर न झाल्याने पुन्हा दुसऱ्यांदा परळी कोर्टाने राज ठाकरे यांना अटक वॉरंट काढले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता राज ठाकरे कोणती कायदेशीर पावलं उचलतात हे पहावं लागणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT