2 असो किंवा 3 डोस.. तरीही नवा व्हेरिएंट तुम्हाला करतो कोरोना पॉझिटिव्ह!

मुंबई तक

ADVERTISEMENT

covid 19 in india omicron sub varient xbb 116
covid 19 in india omicron sub varient xbb 116
social share
google news

Covid 19 In India : भारतात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. देशभरातील अनेक राज्यातून कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. सोमवारी देशभरातून 3 हजार 641 नवीन रूग्ण सापडले होते. तर एका दिवसात देशभरात 11 रूग्णांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महाराष्ट्रात 3, दिल्ली, केरळ आण राजस्थानमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीमुळे कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान सध्या नागरीकांमध्ये सापडलेला वेरियंट नेमका कोणता आहे? या वेरीयंटची लक्षणे काय? व्हायरस किती धोकादायक आहे? या व्हेरीयंटवर WHO चे म्हणणे काय आहे? हे जाणून घेऊयात. (covid 19 in india omicron sub varient xbb 116 know the symptomps)

WHOचं म्हणणं काय?

देशात कोरोनाची रूग्णसंख्या वाढण्यामागचे प्रमुख कारण ओमिक्रॉनचा सबवेरियंट XBB.1.16 आहे. या व्हेरियंटची आता 60 टक्के प्रकरणे समोर आली आहे, अशी माहिती भारतीय सार्स कोव 2 जीनोमिक्स कंसोर्टीयमने दिली आहे. एका रिपोर्टनुसार, देशात 25 ते 30 टक्के कोरोनाची प्रकरणे XBB व्हेरियंट आणि त्याच्या सब वेरियंटची आहेत. WHO ने देखील असेच मत नोंदवले आहे. WHO नुसार 27 फेब्रुवारी 2023 पासून 26 मार्च 2023 वाढणाऱ्या कोरोनामध्ये ओमिक्रॉन वेरियंट आणि सब वेरीयंट XBB.1.16ची रूग्णसंख्या जास्त आहे.

‘या’ नागरीकांना धोका

कोरोनामुळे होणारे मृत्यू आणि रूग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये ओमिक्रॉनचा सब वेरीयंट XBB.1.16 आहे. हा त्या लोकांच्या जास्त संपर्कात येतो, ज्यांना आधीपासूनच आजारपणाने ग्रासले आहे. विशेष म्हणजे या व्हेरियंटवर कोणताच डोस काम करत नाही. जर तुम्ही बुस्टर डोस जरी घेतला असला तरी तुम्हाला या कोरोनाचा धोका आहे. तसेच 60 वर्षावरील वृद्धांना, हृदय रोग, कोरोनही धमनी रोग, मधुमेह, एचआयव्ही पॉझिटीव्ह, फुप्फुस, मुत्रपिंड किंवा यकृताचा आजार असलेल्यांना धोका आहे,.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

140 टक्के वेगाने पसरतो नवा व्हेरियंट

XBB.1.16 व्हेरियंट XBB.1.5 हा व्हेरियंट 140 टक्के वेगाने पसरतो. त्यामुळे तो आणखीण आक्रामक होतो. या व्हेरियंटमध्ये तीन स्पाईक म्युटेशन आहेत. E180V,K478R,S486P आहेत. कोरोना व्हायरसचे हे नवीन म्युटेशन तुमच्या इम्युनिटीलाही चकमा देऊ शकतात, अशी माहिती WHOचे वॅक्सीन सेफ्टी नेट सदस्य डॉ विपिन वशिष्ठ यांनी दिली आहे.

लक्षणे काय?

देशात वेगाने वाढणाऱ्या XBB.1.16व्हेरियंटमध्ये काही वेगळी लक्षणे समोर आली नाही आहेत. कोरोनाच्या जुन्या व्हेरियंटमध्ये जी लक्षणे होती, तीच यामध्ये देखील आहेत. थकवा लागणे, घसा खवखवणे, डोकेदुखी, स्नायु दुखणे, नाक वाहणे आणि खोकला अशी लक्षणे आढळतात. याशिवाय काही लोकांना ओटीपोटीत दुखणे, अस्वस्थता आणि जुलाबाची तक्रार असू शकते.

ADVERTISEMENT

दरम्यान जर वरील लक्षणे तुमच्यामध्ये आढळली तर स्वत:ला आयसोलेट करा आणि नंतर कोरोनाची चाचणी करून घ्या, तसेच वातावरणातील बदलामुळे फ्लुची प्रकरणे वाढली आहे, ज्यामध्ये कोरोना सारखीच लक्षणे आहेत. त्यामुळे तुम्हाला सामान्य फ्लुही असू शकतो.त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT