मोठी बातमी! 3 जानेवारीपासून 15 ते 18 या वयोगटातील मुलांना मिळणार कोरोना प्रतिबंधक लस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरतोय असं वाटत असतानाच ओमिक्रॉन या व्हेरिएंटने डोकं वर काढलं. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. महाराष्ट्रात रूग्णसंख्या वाढू लागली आहे. देशातही कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. विशेष बाब म्हणजे लस घेतलेल्यांनाही कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची बाधा झाली आहे असंही समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. ते पाऊल आहे लसीकरणाचं. ज्येष्ठ नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स या सगळ्यांना बुस्टर डोस दिला जाणार आहे. तर 15 ते 18 या वयोगटातील किशोरवयीन मुलांनाही लस देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे.

Omicron Variant : कोरोनाच्या व्हेरिएंटवर लस किती प्रभावी? लसीकरण झालेल्यांनाही ओमिक्रॉनचा धोका?

हे वाचलं का?

आता 3 जानेवारीपासून म्हणजेच पुढच्या सोमवारपासून 15 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी लसीकरण सुरू केलं जाणार आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्यांना कोव्हॅक्सिन ही लस दिली जाणार आहे.

ADVERTISEMENT

काय काय म्हटलं आहे सरकारने?

ADVERTISEMENT

Covid 19 प्रतिबंधात्मक लसीकरण 15 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी सुरू केलं जाणार आहे. 3 जानेवारी 2022 पासून हे लसीकरण सुरू केलं जाणार आहे. हे व्हॅक्सिन कोव्हॅक्सिनच असणार आहे

ज्या ज्येष्ठ नागरिकांना कोव्हिडचा बूस्टर डोस घ्यायचा आहे त्यांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना त्याचप्रमाणे फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना 10 जानेवारीपासून तो घेता येईल. ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना, फ्रंटलाईन वर्कर्सना, ज्येष्ठ नागरिकांना लसीचे दोन डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले आहेत त्यांना प्राथमिकतेने बूस्टर डोस देण्यात येईल. दुसरा डोस घेऊन 39 आठवडे पूर्ण झालेल्यांना हा बूस्टर डोस तातडीने दिला जाणार आहे.

60 वर्षे आणि त्यावरील सहव्याधी असलेल्या ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस घेऊन झाले आहेत त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बूस्टर डोस घेता येणार आहे.

60 वर्षे आणि त्यावरील वयाच्या नागरिकांना जर कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घ्यायचा असेल तर त्यांना कोविन अॅपवर नोंदणी करावी लागणार आहे.

कोरोना लसीचा बूस्टर डोस घेण्याआधी जे नोंदणी करतील त्यांना SMS द्वारे बूस्टर डोससाठी सूचित केलं जाणार आहे.

15 ते 18 वर्षे वयोगटासाठी सूचना

15 वर्षे आणि त्यावरचे वय असणारी मुलं लसीकरणासाठी कोविन या अॅपवर नोंदणी करू शकतील. 15 ते 18 हे वय असलेली मुलं लसीकरणासाठी ही नोंदणी करू शकणार आहेत

लस घेण्यासाठीची नोंदणी ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष लस घेण्यासाठीच्या ठिकाणी जाऊन करता येईल

3 जानेवारी 2022 पासून या सगळ्या गाईडलाईन्स अंमलात येणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT