Vaccination चा वेग वाढणार, जुलै महिन्यापर्यंत 14 कोटी डोसचं उत्पादन होणार
केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये एक अहवाल सादर केला आहे. ज्यामध्ये केंद्राने म्हटलं आहे की कोरोना प्रतिबंधात्मक लसींचं उत्पादन हे जुलै महिन्यापर्यंत 14 कोटी होईल. कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही या तिन्ही लसींचं मिळून 14 कोटी लसी तयार होतील असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. भारतात लसींचा तुटवडा भासतो आहे. महाराष्ट्रात तर 18 ते 44 या […]
ADVERTISEMENT

केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये एक अहवाल सादर केला आहे. ज्यामध्ये केंद्राने म्हटलं आहे की कोरोना प्रतिबंधात्मक लसींचं उत्पादन हे जुलै महिन्यापर्यंत 14 कोटी होईल. कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही या तिन्ही लसींचं मिळून 14 कोटी लसी तयार होतील असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.
भारतात लसींचा तुटवडा भासतो आहे. महाराष्ट्रात तर 18 ते 44 या वयोगटासाठीचं लसीकरण तूर्तास स्थगित करण्याची वेळ आली आहे. अशात लसी कधी उपलब्ध होतील हा प्रश्न आपल्यापुढे आहे. त्यात आता केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या एका अहवालात जुलै 2021 पर्यंत 14 कोटी लसींचं उत्पादन होईल असं म्हटलं आहे. यामध्ये त्यांनी आयात केल्या जाणाऱ्या लसींची संख्या समाविष्ट केलेली नाही.
Maharashtra Vaccination: लसीकरण कधीपर्यंत सुरळीत होणार?, महाराष्ट्रातील जनतेचा सवाल!
9 मे रोजी जो अहवाल सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला त्यामध्ये केंद्र सरकारने हे स्पष्ट केलं आहे की भारतात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही या तीन लसींचं उत्पादन 14 कोटींपर्यंत जाईल. जुलै 2021 या महिन्यापर्यंत हे उत्पादन इतकं वाढेल. केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे जर उत्पादन इतकं वाढलं तर भारताला रोज 46 लाख लसी सरासरी मिळू शकणार आहेत. 16 जानेवारीला भारतात सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली. आत्तापर्यंत 17.27 कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. 16 जानेवारीपासून आत्तापर्यंतचा विचार केला तर मागच्या साधारण 115 दिवसात भारताला दररोज 15 लाख डोस देता आले आहेत. जर 14 कोटी डोसची निर्मिती झाली तर आत्तापेक्षा तेव्हा रोज तिप्पट लसींचे डोस भारताला देता येणार आहेत.