Oxygen Shortage Death : हो, ऑक्सिजन तुटवड्यामुळे रुग्णांचे बळी गेले; केंद्राची संसदेत माहिती
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अभूतपूर्व परिस्थिती बघायला मिळाली. रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्यानं बेड औषधी आणि ऑक्सिजनचाही प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता आणि अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या होत्या. मात्र, देशात ऑक्सिजन तुटवड्यामुळे एकही मृत्यू झाला नसल्याचं केंद्रानं म्हटलं होतं. पण, आता सरकारने ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय आरोग्य […]
ADVERTISEMENT
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अभूतपूर्व परिस्थिती बघायला मिळाली. रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्यानं बेड औषधी आणि ऑक्सिजनचाही प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता आणि अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या होत्या. मात्र, देशात ऑक्सिजन तुटवड्यामुळे एकही मृत्यू झाला नसल्याचं केंद्रानं म्हटलं होतं. पण, आता सरकारने ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं लेखी उत्तरात ही माहिती दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. आंध्र प्रदेश सरकारनं याबद्दलची माहिती दिली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी मंगळवारी लेखी उत्तरात दिली. कोरोनाच्या संसर्गानंतर उपचाराधीन असलेले काही रुग्ण व्हेंटिलेटर्सवर होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
आंध्र प्रदेश सरकारनं 9 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारला अहवाल पाठवला आहे. 10 मे रोजी श्री व्यंकटेश्वर रामनारायण रुईया शासकीय रुग्णालयात काही रुग्णांवर व्हेंटिलेटर्सच्या साहय्याने उपचार केले जात होते. रुग्णालयाच्या ऑक्सिजन टँकमध्ये ऑक्सिजन भरला जात होता. याच वेळी प्रेशर कमी झाल्यानं ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला आणि काही रुग्णांचा मृत्यू झाला, असं प्राथमिक चौकशी अहवालात दिसून आलं असल्याचं केंद्रानं म्हटलं आहे.
हे वाचलं का?
देशात किती जणांचे बळी गेले?; केंद्र 13 ऑगस्ट रोजी सांगणार
ADVERTISEMENT
दुसऱ्या लाटेची तीव्रता आणि ऑक्सिजनची मागणी वाढल्यानं भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. वेळेवर ऑक्सिजनसह उपचार न मिळल्यानं कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागले. ऑक्सिजनअभावी मृत्यू झालेल्या रुग्णांची आकडेवारी केंद्राकडे विचारण्यात आली होती. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी अशी आकडेवारी दिली नसल्याचं सांगत एकही मृत्यू झालं नसल्याचं केंद्र म्हणाले होते. मात्र, त्यानंतर केंद्राने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे झालेल्या मृत्यूबद्दलची आकडेवारी सादर करण्यास सांगितलं होतं. राज्यांकडून माहिती मिळाली असून, 13 ऑगस्ट रोजी ही आकडेवारी केंद्र संसदेत सादर करणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT