Omicron Variant : ओमिक्रॉनमुळे यंत्रणा अलर्ट; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक सुरू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरातील देश सतर्क झाले आहेत. भारतात आणि महाराष्ट्रातही यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. नव्या व्हेरिएंटचा राज्यात शिरकाव होऊ नये म्हणून राज्य सरकार प्रतिबंधात्मक पावलं उचलण्यास सुरू केली असून, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे.

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाचा वेग प्रचंड असल्याने कोरोनाचं संकट वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खबरदारीचे उपाय राज्या हाती घेण्यात येत आहेत. मुंबई आर्थिक राजधानी असल्याने परदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सरकारने नव्याने निर्बंध लागू केले असून, मुख्यमंत्र्यांनी मॅरेथॉन बैठका सुरू केल्या आहेत.

Covid 19 : आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; KDMC प्रशासनाची उडाली झोप

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. कोविड परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना हाती घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.

राज्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. सकाळी 10:30 वाजता ही बैठक सुरू झाली असून, मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित आहेत. सरकारने निर्बंध लागू केलेले असले, तरी निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

COVID 19 : लॉकडाऊन नको असेल, तर…; मुख्यमंत्री ठाकरेंनी अधिकाऱ्यांंना दिले महत्त्वाचे आदेश

ADVERTISEMENT

शाळा सुरु करण्याबद्दल होणार चर्चा?

1ली ते 7वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. मात्र, ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनीही तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत चर्चा होऊ शकते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT