मुंबईहून गोव्यात गेलेल्या क्रूझमधील 66 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, प्रवाशांना गोव्यात उतरण्यास मज्जाव
पणजी: मुंबईहून गोव्याला आलेल्या क्रूझमधील प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. क्रूझमधील तब्बल 66 प्रवासी कोव्हिड पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे गोव्यातील प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी ही क्रूझ मुंबईहून गोव्यात पोहोचली होती. क्रूझमधील एक क्रू-मेंबर हा कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आला. ज्यानंतर या जहाजातील 2000 हून अधिक प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात […]
ADVERTISEMENT

पणजी: मुंबईहून गोव्याला आलेल्या क्रूझमधील प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. क्रूझमधील तब्बल 66 प्रवासी कोव्हिड पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे गोव्यातील प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी ही क्रूझ मुंबईहून गोव्यात पोहोचली होती.
क्रूझमधील एक क्रू-मेंबर हा कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आला. ज्यानंतर या जहाजातील 2000 हून अधिक प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात आली. यासोबतच कोणीही कोरोना टेस्ट झाल्याशिवाय क्रूझमधून बाहेर पडू नये. अशा सूचना सर्वांना देण्यात आल्या होत्या.
याबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टच्या (एमपीटी) संबंधित जिल्हाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कळवण्यात आल्याचे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. आता सरकार प्रवाशांना क्रूझमधून उतरण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा क्रूझ गोव्यात पोहोचलं तेव्हा सर्व प्रवाशांची तपासणी करण्यासाठी पीपीई किटमध्ये टीम पाठवण्यात आल्या होत्या. टीमने 2016 च्या प्रवाशांचे आरटी-पीसीआर नमुने घेतले, ज्यामध्ये तब्बल 66 प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.