Crime : पत्नीने आखला पतीच्या हत्येचा प्लॅन; सुपारीचा असा झाला भांडाफोड
Crime news | Wife made a plan to kill her husband : मुंबई : वसईजवळ नायगाव परिसरात पोलिसांना सापडलेल्या अज्ञात मृतदेहाचा अखेर उलगडा झाला आहे. गोरेगाव परिसरात राहणाऱ्या एका पत्नीनेच पतीची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचं उघडं झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. कमरुद्दीन उस्मान अन्सारी असं मयत पतीचं नाव असून […]
ADVERTISEMENT
Crime news | Wife made a plan to kill her husband :
ADVERTISEMENT
मुंबई : वसईजवळ नायगाव परिसरात पोलिसांना सापडलेल्या अज्ञात मृतदेहाचा अखेर उलगडा झाला आहे. गोरेगाव परिसरात राहणाऱ्या एका पत्नीनेच पतीची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचं उघडं झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. कमरुद्दीन उस्मान अन्सारी असं मयत पतीचं नाव असून अशिया अन्सारी असं आरोपी पत्नीचं नाव आहे. (Crime news | Wife made a plan to kill her husband)
गुन्हे शाखा २ चे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्याकडून याबाबत मिळालेली माहिती अशी की, कमरुद्दीन अन्सारी आणि अशिया अन्सारी दाम्पत्य गोरेगाव पूर्वला भगतसिंग चाळीत राहत होते. पत्नी अशियाने तिच्या शेजारी राहणारे बिलाल पठाण आणि सौफिया पठाण या दाम्पत्याला एक लाख रुपये ची कमरुद्दीनला ठार मारण्यासाठी सुपारी दिली होती.
हे वाचलं का?
Crime : शेतकरी महिलेची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे; ओलांडली क्रूरतेची सीमा!
त्यानुसार बिलाल पठाण आणि सौफिया पठाण यांनी कमरुद्दीन अन्सारीला वसईजवळ नायगाव परिसरात नेलं. दोघांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली आणि त्याचा मृतदेह झाडी झुडपात फेकून दिला. त्यानंतर कमरुद्दीनची पत्नी अशिया हिनेच बांगूरनगर पोलीस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
ADVERTISEMENT
२७ जानेवारीला वळीव पोलिसांना मृतदेह सापडल्यानंतर त्याची ओळख पटविण्याचे मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा २ च्या पोलिसांनी मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरातील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंग तक्रारींचा शोध घेतला आणि मृतदेहाची ओळख पटवून त्याचे राहते घर गाठले.
ADVERTISEMENT
Crime: 60 वर्षीय मामीचा 42 वर्षांच्या भाच्यावर जडला जीव, पुढे…
परिसरातील नागरिकांकडून केलेल्या चौकशीत मयत कमरुद्दीनच्या घराच्या शेजारी राहणारे पती-पत्नी गुन्हा घडल्यापासून घरातून निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी या पती-पत्नीला गुजरातमधील वापी परिसरातून ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून केलेल्या चौकशीत त्यांनी कमरुद्दीनच्या हत्येची कबुली दिली. अनैतिक प्रेम संबंधातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT