Cyrus Mistry Funeral : मंगळवारी वरळी स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

मुंबई तक

मुंबई : टाटा उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं काल (रविवारी) अपघाती निधन झालं. ते 54 वर्षांचे होते. मिस्त्री यांच्यासह केपीएमजी ग्लोबल स्ट्रेटेजी ग्रुपचे संचालक जहांगीर पंडोले यांचेही या अपघातात निधन झाले. अहमदाबाद-मुंबई महामार्गावर पालघरजवळील चारोटी गावाजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. मिस्त्री यांच्यावर उद्या (मंगळवारी) सकाळी 11 वाजता वरळी स्मशानभुमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : टाटा उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं काल (रविवारी) अपघाती निधन झालं. ते 54 वर्षांचे होते. मिस्त्री यांच्यासह केपीएमजी ग्लोबल स्ट्रेटेजी ग्रुपचे संचालक जहांगीर पंडोले यांचेही या अपघातात निधन झाले. अहमदाबाद-मुंबई महामार्गावर पालघरजवळील चारोटी गावाजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. मिस्त्री यांच्यावर उद्या (मंगळवारी) सकाळी 11 वाजता वरळी स्मशानभुमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अंत्यसंस्काराला सर्व क्षेत्रातील लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, अपघातातनंतर मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. मध्यरात्री 2 वाजून 27 मिनिटांनी त्यांचे शवविच्छेदन पूर्ण झाले असून सध्या त्यांचे मृतदेह हॉस्पिटलच्या शवागृहातच ठेवण्यात आले आहेत. सायरस यांचे बरेच नातेवाईक विदेशात असून ते आज संध्याकाळपर्यंत भारतात पोहचण्याचा अंदाज आहे.

Cyrus Mistry Death: सायरस मिस्त्रींच्या मृत्यूचं कारण समोर, डॉक्टर म्हणाले…

पारशी धर्मीय अत्यंविधीला फाटा :

मिस्त्री यांच्यावर वरळी स्मशानभुमीत अत्यंसंस्कार होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या पारशी धर्मातील अत्यंविधीच्या पद्धतीनुसार अत्यंसंस्कार होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पारशी समाजात अंत्यसंस्काराच्या प्रथेला ‘दोखमेनाशिनी’ म्हणतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp