Dahi Handi 2022 : दादरमध्ये दहीहंडीत अफझल खान वधाचा देखावा, या फोटोची होतेय चर्चा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दहीहंडीचा उत्सव दोन वर्षांनी अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो आहे. दहीहंडी म्हटलं की गोविंदांचा उत्साह आणि जल्लोष आलाच. हाच जल्लोष राज्यभरात आणि खासकरून मुंबई-ठाण्यात पाहायला मिळतो आहे. आज मुंबईतल्या दादर भागात आयडीअल लेनमधल्या एका दहीहंडीत छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफझल खानाचा वध केल्याचा देखावा दाखवण्यात आला होता.

ADVERTISEMENT

दहीहंडीत अफझल खान वधाचा देखावा

दादरमधल्या दहीहंडीत गोविंदांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो अफझल खानाचा वध केला तो देखावा साकारला. या देखाव्याची चर्चा दिवसभर होते आहे. सकाळच्या सुमारास हा देखावा सादर करण्यात आला. या देखाव्याची चर्चा चांगलीच होते आहे. गोविंदांनी थरांवर थर रचत वरती दोन गोविंदांना उभं केलं. यापैकी एकाने छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती. तर एकाने अफझल खानाची वेशभूषा केली होती. प्रतापगडावर ज्याप्रमाणे अफझल खानाचा वध करण्यात आला तसाच देखावा दहीहंडीत सादर करण्यात आला.

दहीहंडीत राजकीय हंड्यांचीही चर्चा

गेल्या काही दिवसांपासून वरळीतलं राजकीय वातावरण हे काहीसं तापलेलं दिसून येतं आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने ही सुरूवातच मानली जाते आहे. वरळीतल्या जांबोरी मैदानात भाजपतर्फे आज दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. युवकांचा उत्साह द्विगुणित होतो आहे. अशात देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली होती. तर भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही आदित्य ठाकरेंवर आणि शिवसेनेवर टीका कोली होती.

हे वाचलं का?

भ्रष्टाचाराची दहीहंडी आम्ही फोडणारच

आमच्या सरकारने गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे गोविंदामध्ये उत्साह पाहण्यास मिळतो आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भ्रष्टाचाराची हंडी फोडण्यास सुरूवात झाली आहे. आम्हीदेखील मुंबई महापालिकेतल्या भ्रष्टाचाराची हंडी फोडणार आणि मलई गरीबांना वाटणार आहोत असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईतल्या वरळी भागात जे जांबोरी मैदान आहे तिथे देवेंद्र फडणवीस आले होते. या मैदानातच देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT