प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, किचनमध्ये पुरला मृतदेह; मुलीच्या जबाबामुळे उघडकीस आला गुन्हा
प्रियकराच्या मदतीने पत्नीने आपल्याच पतीची हत्या करुन नंतर मृतदेह आपल्याच किचनमध्ये पुरल्याची धक्कादायक घटना दहिसरच्या खान कंपाऊंड भागात घडली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे पत्नीने हे सर्व कृत्य आपल्या सहा वर्षाच्या मुलीच्या समोर केलं. अखेरीस याच मुलीच्या जबाबामुळे हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी २७ वर्षीय आरोपी शहीदाला अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा भागात राहणाऱ्या […]
ADVERTISEMENT
प्रियकराच्या मदतीने पत्नीने आपल्याच पतीची हत्या करुन नंतर मृतदेह आपल्याच किचनमध्ये पुरल्याची धक्कादायक घटना दहिसरच्या खान कंपाऊंड भागात घडली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे पत्नीने हे सर्व कृत्य आपल्या सहा वर्षाच्या मुलीच्या समोर केलं. अखेरीस याच मुलीच्या जबाबामुळे हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी २७ वर्षीय आरोपी शहीदाला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
उत्तर प्रदेशातील गोंडा भागात राहणाऱ्या रईस शेख याचं २०१२ साली शहीदासोबत लग्न झालं. लग्नानंतर दोघेही दहीसरमध्ये खान कंपाऊंड भागात भाड्याच्या घरात राहत होते. रईस दहीसर पूर्व भागात एका कपड्याच्या दुकानात नोकरी करायचा. रईस आणि शहीदाला ६ वर्षांची एक मुलगी आणि अडीच वर्षाचा एक मुलगा आहे. यादरम्यान शहीदाचे शेजारी राहणाऱ्या अनिकेत उर्फ अमित मिश्रासोबत अनैतिक संबंध जुळले. ही गोष्ट रईसच्या कानावर पडल्यानंतर त्याने याला विरोध करायला सुरुवात केली.
हे वाचलं का?
यानंतर शहीदाने अमितच्या सोबतीने रईसचा काटा काढण्याचा प्लान आखला. ११ दिवसांपूर्वी शहीदा आणि अमित यांना रईसने आपल्याच घरात शाररिक संबंध ठेवताना रंगेहाथ पकडलं. यावेळी दोघांनी मिळून घरातल्या चाकूने रईसची गळा कापून हत्या केली. याचवेळी शहीदाची ६ वर्षीय मुलगी घरात आली आणि तिने हा प्रकार पाहिला. यानंतर शहीदाने आपल्याच मुलीला बाहेर कुठेही हा प्रकार सांगितलास तर तुलाही असंच मारुन टाकेन असं धमकावलं. अमितच्या मदतीने शहीदाने रईसच्या मृतदेहाचे तुकडे करत मृतदेह आपल्याच घरातील किचनमध्ये पुरला.
दरम्यान खूप दिवस झाले तरी शहीद दिसत नसल्यामुळे खान कंपांऊंड भागात चर्चांना उधाण आलं. या भागात राहणाऱ्या रईसच्या मित्राने दहीसर पोलीस ठाण्यात रईस बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान शहीदाने रईसचा मोबाईल आपल्याकडे ठेवून घेत, उत्तर प्रदेशात आपल्या घरी रईस न सांगता कुठेतरी निघून गेला असं सांगायला सुरुवात केली. दरम्यान काही दिवसांनी रईसचा भाऊ उत्तर प्रदेशातून आला असता ६ वर्षीय मुलीने आपल्या काकाला आईने केलेल्या कृत्याची माहिती दिली. यानंतर रईसच्या भावाने मुलीला घेत दहीसर पोलीस ठाण्यात जाऊन याबद्दल माहिती दिली.
ADVERTISEMENT
यानंतर मंगळवारी दहीसर पोलिसांनी खान कंपाऊंड भागात कारवाई करत रईसच्या घरातलं किचन खोदलं. या खोदकामात रईसचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहीदाने आपला गुन्हा मान्य केला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT