राणे-सोमय्यांकडून शिवसेनेवर रोज आरोप; आदित्य ठाकरेंनी एका ओळीत संपवला विषय
सध्या महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. शिवसेना नेते संजय राऊत हे किरीट सोमय्यांवर आरोप करत आहेत. मग त्यांना उत्तर देण्यासाठी किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेतात. त्यानंतर चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया देतात. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर विविध आरोप केले. त्यानंतर विनायक राऊत आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी […]
ADVERTISEMENT

सध्या महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. शिवसेना नेते संजय राऊत हे किरीट सोमय्यांवर आरोप करत आहेत. मग त्यांना उत्तर देण्यासाठी किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेतात. त्यानंतर चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया देतात. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर विविध आरोप केले. त्यानंतर विनायक राऊत आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन नारायण राणेंना आव्हान दिलं.
ट्विटर वॉर तर सुरूच असतं. अशात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मात्र शिवसेनेवर होणाऱ्या आरोपांचा विषय अवघ्या एका वाक्यात संपवला आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी एका ओळीचं उत्तर देऊन त्यांनी हा विषय संपवला.
मातोश्री २ चं बेकायदा काम पैसे देऊन रेग्युलर करण्यात आलं, नारायण राणेंचा आरोप
पुण्यातील येरवडा येथील डॉ.चिमा उद्यान या ठिकाणी उभारण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाची पाहणी आणि उदघाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. उपसभापती नीलम गोऱ्हे,शिवसेना नेते सचिन अहिर,शिवसेना नेते आदित्य शिरोडकर, पुणे महानगरपालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार,आयोजक नगरसेवक संजय भोसले तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.










