दाऊदची नजर भारतावर कायम, अजुनही खंडणीचं रॅकेट चालवत असल्याची ‘ईडी’च्या सूत्रांची माहिती

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवरील कारवाईमुळे चर्चेत असलेल्या ईडीने गेल्या काही दिवसांमध्ये आपला मोर्चा अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहीमकडे वळवला आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने दाऊद आणि छोटा शकील यांच्याशी संबंधित लोकांच्या मालमत्तांवर छापेमारी करत चौकशीला सुरुवात केली आहे. ईडी मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊद हा अजुनही सक्रीय असून तो मनी लाँड्रीगच्या माध्यमातून भारतात आपले काळे धंदे करत आहे. याव्यतिरीक्त दाऊद अजुनही भारतात आपल्या हस्तकांमार्फत खंडणीचं रॅकेट चालवत असल्याचंही ईडीच्या सूत्रांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

भारत आणि आखाती देशांचा विचार केला असता सट्टेबाजी हा दाऊदच्या गँगचा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असल्याचं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं. हवालाच्या माध्यमातून हा पैसा दाऊद भारतामधून आखाती देशांमध्ये वळवत असल्याचं समोर आलंय. गेल्या काही वर्षांपासून दाऊदची गँग भारतात रिअल इस्टेट क्षेत्रात आपली दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असून दाऊदचे काही हस्तक अजुनही भारतात त्याच्या नावाने खंडणी गोळा करण्याचं काम करत असल्याचं ईडीने सांगितलं.

ईडी दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकरची चौकशी करणार असून गरज पडल्यास ईडी इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन दाऊदच्या आर्थिक व्यवहारांविषयी माहिती घेणार असल्याचं कळतंय. मनी लाँड्रींगच्या माध्यमातून देशातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली ईडीने गेल्या काही दिवसांत दाऊत आणि छोटा शकीलच्या समर्थकांच्या मालमत्तावर कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली आहे.

हे वाचलं का?

इक्बाल कासकरची कस्टडी मिळावी यासाठी ईडी न्यायालयात अर्ज करणार असल्याचंही कळतंय. २०१७ साली ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचने दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात इक्बाल कासकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. ईडीने दाऊद इब्राहीमची बहिण हसीना पारकरच्या नागपाडा येथील अड्ड्यांवर छापेमारी केल्याचं कळतंय. हसीना पारकरसोबत ईडीने छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुटचीही ईडीने चौकशी केल्याचं कळतंय.

ईडीने सलीम फ्रुटला बुधवारी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. सलीम फ्रुटने काही काळापूर्वी पाकिस्तानला जाऊन आल्याची ईडीला माहिती मिळाली आहे. तसेच भेंडी बाजारात चालत असलेल्या एका गँगसाठी सलीम फ्रुट काम करत असल्याचंही ईडीला कळलंय.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT