बीडच्या सुपुत्राचा राजधानी दिल्लीत कर्तव्यावर असताना मृत्यू, हिंगणी गावावर शोककळा
रोहिदास हातागळे, प्रतिनिधी, बीड राजधानी दिल्ली येथे कर्तव्यावर असताना बीड जिल्ह्यातील हिंगणी गावातील जवान अविनाश कल्याण आंधळे वय 29 हे कर्तव्यावर असताना हार्ट अटॅक आल्याने मृत्यू झाला आज बीड जिल्ह्यातील हिंगणी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. शेतकरी कुटुंबातील असलेले जवान अविनाश हे सहा वर्षांपासून देशसेवा बजावत होते.त्यांच्या निधनाची बातमी समजताच हिंगणी गावासह […]
ADVERTISEMENT
रोहिदास हातागळे, प्रतिनिधी, बीड
ADVERTISEMENT
राजधानी दिल्ली येथे कर्तव्यावर असताना बीड जिल्ह्यातील हिंगणी गावातील जवान अविनाश कल्याण आंधळे वय 29 हे कर्तव्यावर असताना हार्ट अटॅक आल्याने मृत्यू झाला आज बीड जिल्ह्यातील हिंगणी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. शेतकरी कुटुंबातील असलेले जवान अविनाश हे सहा वर्षांपासून देशसेवा बजावत होते.त्यांच्या निधनाची बातमी समजताच हिंगणी गावासह राज्यभर शोककळा पसरली आहे.
जवान अविनाश यांचे पार्थिव आज दुपारी त्यांच्या मुळ गावी हिंगणी येथे दिल्लीहून आणले. त्यांच्या पार्थिवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान अविनाश त्यांचे वडिल शेतकरी आहेत त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर शोक व्यक्त केला.
हे वाचलं का?
काय म्हटलं आहे धनंजय मुंडे यांनी?
ADVERTISEMENT
आमच्या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र, वीर स्व. अविनाश आंधळे यांचे दिल्ली येथे देशसेवेत असताना दुःखद निधन झाले, बीड जिल्ह्याच्या मातीत जन्मलेले अविनाश सदैव आम्हा जिल्हा वासीयांच्या हृदयात राहतील. आंधळे कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात मी सहभागी आहे. स्व. अविनाश यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे पंकजा मुंडे यांनी?
भारतीय सैन्यात कार्यरत बीड तालुक्यातील हिंगणी (खु) गावचे वीर जवान अविनाश कल्याण आंधळे यांचे कर्तव्यावर असताना शहिद झाले. जिल्ह्याच्या भूमीपुत्राने राष्ट्रसेवेत सर्वस्व अर्पण केले. अविनाश यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT