Pallavi Dey: अभिनेत्रीचा राहत्या घरातच लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
कोलकाता: बंगाली टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून एक अतिशय दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. बंगाली टीव्ही अभिनेत्री पल्लवी डे (Pallavi Dey) हिचा लटकलेला मृतदेह कोलकाता येथील राहत्या घरात सापडला आहे. आज (15 मे) सकाळी पल्लवीचा मृतदेह तिच्या घरात आढळून आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासाअंती ही आत्महत्या असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सुरू केला तपास […]
ADVERTISEMENT

कोलकाता: बंगाली टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून एक अतिशय दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. बंगाली टीव्ही अभिनेत्री पल्लवी डे (Pallavi Dey) हिचा लटकलेला मृतदेह कोलकाता येथील राहत्या घरात सापडला आहे. आज (15 मे) सकाळी पल्लवीचा मृतदेह तिच्या घरात आढळून आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासाअंती ही आत्महत्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी सुरू केला तपास
या प्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पल्लवीचा मृतदेह घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. पल्लवीला फासावर लटकलेले पाहून तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच पल्लवीचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
त्यानंतर पोलिसांनी पल्लवीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. पल्लवी डे हिने नेमकी आत्महत्या का केली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी देखील या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अभिनेत्रीच्या मृत्यूचं नेमकं कारणं काय हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. पल्लवी डे हिच्या मृत्यूमुळे तिच्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.