Shraddha Murder: एक होती श्रद्धा वालकर! प्रेमाच्या ३५ तुकड्यांची आक्रंदणारी कहाणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shraddha Murder Mystery : श्रद्धा वालकरने आपल्या प्रियकरासाठी म्हणजेच आफताब पूनावाला साठी वडिलाचं घर सोडलं. लग्न न करताच ती आफताबसोबत लिव्ह इन मध्ये राहू लागली. घरातल्यांनी विरोध केला. आईने समजावलं, वडिलांनी समजावलं पण श्रद्धाने कुणाचंच ऐकलं नाही. मी २५ वर्षांची आहे मला निर्णय घ्यायचा अधिकार आहे असं म्हणत श्रद्धा आफताबसोबत लिव्ह इन मध्ये राहू लागली. याच श्रद्धाचा अत्यंत वाईट पद्धतीने खून झाला आहे. तिची हत्या केल्यानंतर आफताबनेच तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. नेमकं काय घडलं या बातमीतून जाणून घेणार आहोत.

ADVERTISEMENT

” ….तर आज श्रद्धा जिवंत असती ” हत्या झालेल्या मुलीच्या आठवणीत वडील ढसाढसा रडले

आफताबसोबत लग्न करण्याचं श्रद्धाचं स्वप्न

श्रद्धाने आई वडिलांच्या विरोधात जात आफताबसोबत आपलं आयुष्य जगण्यास सुरूवात केली. तीन वर्षे लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतर आता आपण लग्न करावं असं श्रद्धाला वाटत होतं. मात्र तिला हे ठाऊक नव्हतं की ज्या आफताबसोबत आपण सात जन्माचं बंधन बांधायची स्वप्नं पाहतो आहे तो माणूस नाही हैवान आहे.

हे वाचलं का?

इकडे श्रद्धा आफताब सोबत सुखी संसाराची स्वप्न पाहात होती तिकडे आफताब तिच्या हत्येचा कट रचत होता. या दोघांमध्ये बऱ्याचदा खटके उडत होते. मात्र प्रेमी युगुलांमध्ये वाद होणं, खटके उडणं हे काही विशेष नाही. आफताब माफी मागायचा, तिला समजवायचा ती ऐकायची. मात्र या सगळ्यामागे आफताब आपल्या हत्येचा कट रचतोय याचा साधा संशयही श्रद्धाच्या मनाला शिवला नाही. अनेक महिने व्यवस्थित कट रचल्यानंतर आफताबने श्रद्धाची हत्या केली आणि हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले.

ADVERTISEMENT

आफताबने श्रद्धा वालकरच्या खुनाचं प्लानिंग केलं होतं?

आफताबने श्रद्धा वालकरच्या खुनाचं प्लानिंग केलं होतं? की जोशात येऊन तिची हत्या केली या प्रश्नाचं उत्तर दिल्ली पोलीसही शोधत आहेत. श्रद्धा वालकरच्या हत्येचं प्रकरण बारकाईने पाहिलं तर लक्षात येतं की असा प्रकार काही महिन्यांच्या कटाशिवाय करताच येणार नाही. यामागे अनेक कारणं आहे. महाराष्ट्रातून दिल्ली आल्यानंतर १० दिवसातच आफताबने श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडेही केले.

ADVERTISEMENT

मुंबईत असतानाच आफताबला नकोशी झाली होती श्रद्धा?

मुंबईत हे दोघे एकत्र असतानाच आफताबला श्रद्धा नकोशी झाली होती असाही संशय पोलिसांना आहे. श्रद्धाला आफताबशी लग्न करायचं होतं. मात्र आफताब आणि श्रद्धा यांची भेट बंबल या डेटिंग अॅपवर झाली होती. याच अॅपवर त्याची आणखी एका मुलीशी ओळख झाली होती. आफताबला नव्या नात्यात जायचं होतं त्यामुळे त्याला श्रद्धाशी लग्न करण्यात काहीही रस नव्हता. तो दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनमध्ये होता पण त्याने श्रद्धासोबतचं नातं तोडलं नव्हतं. श्रद्धाच्या घरातले आफताबला आणि आफताबच्या घरातले श्रद्धाला ओळखत होते त्यामुळे आफताब हे नातं तोडत नव्हता. कोव्हिडमुळे श्रद्धाच्या आईचा मृत्यू झाला. आई श्रद्धाची काळजी घेत होती. पण ती नसताना श्रद्धा गायब झाली तरीही कुणी विचारणार नाही हेदेखील आफताबला माहित होतं.

हिमाचलचा अँगलही पोलीस तपासत आहेत

पोलीस आता हिमाचल प्रदेशचा अँगलही तपासत आहेत कारण आफताब या ठिकाणी फिरायला गेला होता. आफताबला तेव्हाच तर श्रद्धाला ठार करायचं नव्हतं ना? याचं उत्तर पोलीस शोधत आहेत. कारण हिमाचल प्रदेशात अनेक अशी हिल स्टेशन आहेत जिथे कुणालाही दरीत ढकलून देणं सोपं आहे. आफताबचा हा मनसुबा यशस्वी झाला नाही. त्यामुळे तो दिल्लीत आला. दिल्लीला आल्यानंतर तो काही हॉटेल्समध्ये राहिला. मात्र तिथेही त्याला खून करण्याची संधी मिळाली नाही. यानंतर दिल्लीतला असा भाग त्याने निवडला जिथून काही अंतरावरच जंगल आहे. हत्या केल्यावर मृतदेह जंगलात टाकून द्यायचा म्हणजे त्याचा शोध कुणाला लागणार नाही असं आफताबला वाटत होतं.

दिल्लीतल्या छतरपूर भागात भाडे तत्त्वावर आफताबने घेतली खोली

दिल्लीतल्या छतरपूर भागात भाडे तत्त्वावर आफताबने खोली घेतली. त्यानंतर तो त्या भागात सेटल झाला. तिथे त्याच्यासोबत श्रद्धा होतीच. त्याने वेळ पाहिली आणि भांडण झाल्याचं निमित्त त्याला पुरेसं होतं त्यानंतर गळा दाबून त्याने श्रद्धाची हत्या केली. श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिचं प्रेत जंगलात पुरून टाकणं त्याला कठीण वाटलं. तो मृतदेह उचलून घेऊ जाऊ शकत नव्हता. श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याबाबत त्याने गुगलवर अनेक गोष्टी सर्च करून पाहिले. त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे करायचं ठरवलं.

…आणि श्रद्धाच्या प्रेमाचे ३५ तुकडे झाले

श्रद्धाने डोळे झाकून आफताबवर प्रेम केलं. पण आफताबने तिची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. तुकडे केल्यानंतर रक्त येणार हे त्याला माहित होतं. मग त्याने ते केमिकलही शोधलं ज्यामुळे रक्त स्वच्छ करता येऊ शकतं. सल्फर हायपोक्लोरीक अॅसिडने त्याने रक्ताचे डाग स्वच्छ केले. हे केमिकल वापरल्याने रक्त स्वच्छ होतं आणि फॉरेन्सिकच्या तपासात त्याचे अवशेष मिळत नाहीत. श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने श्रद्धाचे रक्ताळलेले त्याचे आणि श्रद्धाचे कपडे काढले. हे कपडे त्याने एमसीडी कचऱ्याच्या व्हॅनमध्ये फेकले. ज्यामुळे हा पुरावा नष्ट करण्यात त्याला यश आलं.

Bumble डेटिंग अॅपवर भेटले होते श्रद्धा आणि आफताब

Bumble या डेटिंग अॅपवर श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला या दोघांची ओळख झाली होती. २०१८ मध्ये या दोघांची ओळख झाली. डेटिंग अॅपच्या मआध्यमातून २०१९ ला दोघं भेटले. त्यानंतर लिव्ह इन मध्ये राहात होते. श्रद्धा हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आफताब पूनावालाने ही कबुली दिली आहे की रक्त स्वच्छ कसं करायचं हे आफताबने गुगलवर शोधलं होतं. तसंच माणसाच्या शरीराचे तुकडे कसे करायचे हेदेखील त्याने शोधलं होतं. पोलिसांनी आफताबला अटक केल्यानंतर त्याचा मोबाईल तपासला तेव्हा त्यांना या सगळ्याची सर्च हिस्ट्री मिळाली.

श्रद्धाच्या हत्येचं कारण आहे तरी काय?

पोलिसांनी जी माहिती या प्रकरणात दिली आहे त्यानुसार या दोघांमध्ये अलिकडे भांडणं वाढली होती. या दोघांनाही एकमेकांवर संशय होता. आफताबला वाटत होतं की श्रद्धाच्या आयुष्यात दुसरं कुणीतरी आहे. तर श्रद्धा हा दावा करत होती की आफताबच्या आयुष्यात दुसरं कुणीतरी आलं आहे. श्रद्धाच्या हत्येच्या काही महिने आधी दोघं हिलस्टेशनला गेले होते.

१८ मे २०२२ ला काय घडलं?

१८ मे २०२२ ला श्रद्धा आणि आफताब या दोघांमध्ये मोठं भांडण झालं. त्यानंतर या दोघांचा आवाज वाढला त्यावेळी श्रद्धा जोरजोरात ओरडू लागली. त्यावेळी आफताबने तिचं तोंड दाबलं आणि गळा आवळून तिची हत्या केली. तिची हत्या केल्यानंतर आफताबने तिचा मृतदेह बाथरूममध्ये ठेवला होता.

श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची यासाठी त्याने गुगल सर्च केलं. गुगलवर त्याला हे सापडलं की माणसाच्या शरीराचे तुकडे कसे करायचे. यानंतर तो बाजारात जाऊन फ्रिज घेऊन आला. श्रद्धाच्या म़ृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि ते फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर तो रोज फ्रिजमधले काही तुकडे काढून पॉलिथिनमध्ये पॅक करत होता आणि महरौलीच्या जंगलात फेकून यायचा. पोलिसांना त्याने ही माहिती दिली. पोलिसांनी या ठिकाणी त्याला घेऊन शोध केल्यानंतर आत्तापर्यंत त्यांना १३ तुकडे मिळाले आहेत. तर हाडंही अनेक भागांमध्ये मिळाली आहेत.

डेक्स्टर ही वेबसीरिजही आफताबने पाहिली होती

डेक्स्टर ही वेबसीरिजही आफताबने पाहिली होती. श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्याची आयडिया त्याला याच वेब सीरिजमध्ये मिळाली. पोलिसांनी हेदेखील सांगितलं की आफताबच्या आयुष्यात अनेक मुली होत्या. त्यामुळे श्रद्धा आणि आफताबमध्ये खटके उडत होते. त्याचा हा कट सहा महिने यशस्वीही ठरला असंही म्हणता येईल पण अखेर प्रेमाच्या ३५ तुकड्यांना वाचा फुटलीच.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT