Unlock च्या गोंधळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
Unlock च्या गोंधळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री यांनी Unlock संदर्भातली घोषणा केल्यानंतर झालेल्या गोंधळावरून विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते आहे. विजय वडेट्टीवर यांनी राज्यातील 18 जिल्ह्यांमधले सगळे निर्बंध हटवण्यात आले आहेत अशी घोषणा केली, ज्यानंतर गुरूवारी गोंधळ उडाला. सगळे निर्बंध शिथील झाल्याचं चित्र निर्माण झालं. पण […]
ADVERTISEMENT
Unlock च्या गोंधळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री यांनी Unlock संदर्भातली घोषणा केल्यानंतर झालेल्या गोंधळावरून विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते आहे. विजय वडेट्टीवर यांनी राज्यातील 18 जिल्ह्यांमधले सगळे निर्बंध हटवण्यात आले आहेत अशी घोषणा केली, ज्यानंतर गुरूवारी गोंधळ उडाला. सगळे निर्बंध शिथील झाल्याचं चित्र निर्माण झालं. पण असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिलं. या सगळ्या गोंधळावर विरोधकांनी टीका केली. तर आता अजित पवार यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
Confusion over Lockdown: लॉकडाऊन हटवण्याबाबत प्रचंड मोठा गोंधळ, सरकार म्हणतं अजून लॉकडाऊन हटवलेला नाही!
काय म्हणाले अजित पवार?
हे वाचलं का?
Unlock बाबत पूर्णपणे सुसंवाद आहे. ज्या दिवशी कोरोना आला तेव्हापासून राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांसमोर येतात. त्यानंतर अनेकदा राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपेही भूमिका मांडत असतात. विजय वडेट्टीवर यांच्याकडून तत्वतः एवढा एक शब्द राहून गेला त्यामुळे गैरसमज झाला. शेवटी सरकार कुणाचंही असलं तरीही राज्याचे मुख्यमंत्री सांगतील तोच निर्णय अंतिम असतो असं सांगत अजित पवार यांनी या सगळ्या गोंधळावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
ADVERTISEMENT
राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याचा प्रस्ताव असून त्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. मात्र मुंबईहून नागपूरला येण्याच्या गडबडीत प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना तत्त्वतः हा शब्द विसरून गेलो असं स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. त्यानंतर शुक्रवारी म्हणजेच आज ते प्रसारमाध्यमांना म्हणाले की अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला आहे. त्यांची संमती मिळाल्यानंतर अधिसूचना निघेल आणि जिल्ह्यांमधल्या परिस्थितीनुसार ते लागू होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
एक मुख्यमंत्री बाकीचे सुपर मुख्यमंत्री ! Lockdown-Unlock च्या गोंधळावर फडणवीसांची राज्य सरकारवर टीका
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?
या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आहेत आणि बाकीचे सुपर मुख्यमंत्री आहेत. कुठल्याही सरकारमध्ये एखाद्या पॉलिसीवर निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. परंतू या सरकारमध्ये एकाच विषयावर ५-५ मंत्री बोलतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या श्रेयवादाची लढाई सुरु आहे. याच लढाईतून हा गोंधळ झाला असल्याचं फडणवीस म्हणाले. फडणवीस नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त घालावी, लोकांमध्ये सध्या गोंधळाचं वातावरण आहे. त्यामुळे कोणत्याही महत्वाच्या विषयावर सरकारने थेट बोलावं असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या गोंधळावरुन सरकारला चांगलंच धारेवर धरलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT