शिंदे सरकारच्या खातेवाटपावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; पुढचंही सगळंच सांगितलं
– योगेश पांडे, नागपूर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटप मात्र रखडले होते. मात्र आता खातेवाटप झालेलं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप जाहीर केलं आहे. येत्या १७ तारखेपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे, त्यामुळे मंत्र्यांचे खातेवाटप होणं गरजेचं होतं. खाते वाटपानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली. खातेवाटपावर काय म्हणाले […]
ADVERTISEMENT
– योगेश पांडे, नागपूर
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटप मात्र रखडले होते. मात्र आता खातेवाटप झालेलं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप जाहीर केलं आहे. येत्या १७ तारखेपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे, त्यामुळे मंत्र्यांचे खातेवाटप होणं गरजेचं होतं. खाते वाटपानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
खातेवाटपावर काय म्हणाले फडणवीस?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
खाते वाटप करणे हे मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी खातेवाटप केलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व मंत्री जे खाते आम्हाला मिळाले आहे, त्या खात्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. हे अर्धच मंत्रिमंडळ आहे. त्यामुळे सर्वांवर जास्त भार आहे. पुढील विस्तारात आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असं देखील ते म्हणाले.
आगामी मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल काय म्हणाले फडणवीस?
ADVERTISEMENT
भाजप आणि शिंदे यांच्या मंत्र्यांकडे जे अतिरिक्त खाते देण्यात आले आहेत. ते त्या पक्षातील भविष्यात येणाऱ्या मंत्र्यांना मिळतील. खात्यात अदला बदल करायचे असल्यास आम्ही चर्चा करून ते करू, असं फडणवीस म्हणाले. आमच्यात खात्याबद्दल कुठलाही वाद नाहीये. विस्तार कधी करायचा हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. योग्य वेळ पाहून ते ठरवतील, असं पुढील मंत्रीमंडळ विस्ताराबद्दल फडणवीस म्हणाले.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरेंना लगावला टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप आणि शिवसेनेत 2019 साली अडीच- अडीच वर्षाचा मुख्यमंत्री असा फॉर्मुला कधीच नव्हता, असं म्हणाले. यावर मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यामध्ये पूर्ण तथ्य आहे, असं फडणवीस म्हणाले. अडीच वर्षांचा फॉर्मुला कधीच नव्हता. मी पहिल्या दिवसापासून साक्षीदार आहे. सर्व वाटाघाटी मी केल्या आहे, असं देखील ते म्हणाले. मात्र आपल्याला कधी-कधी आश्चर्य वाटते की ते बेइमानीचा आरोप करतात, मात्र, सर्वात मोठी बेईमानी तर आमच्या सोबत झाली आहे, असं फडणवीस म्हणाले. आमच्या सोबत जे निवडून आले ते जर आम्हाला सोडून विरोधकांशी हात मिळवणी करत असतील तर यापेक्षा जास्त मोठा विश्वासघात काय असू शकतो, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
भाजपला कोणती खाती मिळाली?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार
राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास
गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास
सुरेश खाडे- कामगार
अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
शिंदे गटाला मिळालेली खाती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादा भुसे- बंदरे व खनिकर्म
संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन
संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय सामंत- उद्योग
प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
अब्दुल सत्तार- कृषी
दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क
ADVERTISEMENT