पालिका उपायुक्त भर सभेत सॅनिटायजर प्यायले…
मुंबई तक: मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त रमेश पवार भर सभेत सॅनिटायजर प्यायले. मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच आयुक्तांनी पाणी पिण्यासाठी म्हणून गेले आणि त्यांनी टेबलावर ठेवलेली बाटली तोंडाला लावली. बुधवारी महानगरापालिकेच्या सभागृहात ही घटना घडली. उपायुक्त रमेश पवार पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत होते सादर करत होते. शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी यांना सादर केला. […]
ADVERTISEMENT
मुंबई तक: मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त रमेश पवार भर सभेत सॅनिटायजर प्यायले. मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच आयुक्तांनी पाणी पिण्यासाठी म्हणून गेले आणि त्यांनी टेबलावर ठेवलेली बाटली तोंडाला लावली.
बुधवारी महानगरापालिकेच्या सभागृहात ही घटना घडली. उपायुक्त रमेश पवार पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत होते सादर करत होते. शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी यांना सादर केला. त्यानंतर त्यांनी अर्थसंकल्प वाचण्यापूर्वी पाणी पिण्यासाठी टेबलवरुन एक बाटली उचलून तोंडाला लावली. ती बाटली सॅनिटायजरची होती. त्यातलं सॅनिटायजर तोंडात गेल्यानंतर उपायुक्तांना पाण्याऐवजी सॅनिटायजर प्यायल्याचं लक्षात आलं. पालिकेचे इतर अधिकारीही त्यांच्या मदतीला धावले.
त्यानंतर उपायुक्त ती सॅनिटायजर थुंकण्यासाठी बाहेर गेले. तिथून परत येऊन त्यांनी शिक्षण समितीचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करुन झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना पवार यांनी त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले. तसेच, टेबलावर सारख्याच बाटल्या ठेवलेल्या असल्याने आणि त्यावर लेबल नसल्याने हा गोंधळ झाल्याचे उपायुक्त म्हणाले. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी टेबलावरील सॅनिटायजरच्या बाटल्या काढून टाकल्या.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
(ही घटना 3 फेब्रुवारीला घडलेली आहे)
ADVERTISEMENT