लिव्ह इन रिलेशनशीपचा हव्यास… मुलीने जन्मदात्या आईचा गळाच चिरला!
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील आंबेडकर नगर भागात एक अत्यंत धक्कदायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 फेब्रुवारीला एका महिलेची काही जणांकडून हत्या झाल्याचा फोन आला होता. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना 55 वर्षीय सुधा राणी यांचा रक्ताने माखलेला मृतदेह घराच्या पहिल्या मजल्यावर बेडवर पडलेला दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील आंबेडकर नगर भागात एक अत्यंत धक्कदायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 फेब्रुवारीला एका महिलेची काही जणांकडून हत्या झाल्याचा फोन आला होता. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना 55 वर्षीय सुधा राणी यांचा रक्ताने माखलेला मृतदेह घराच्या पहिल्या मजल्यावर बेडवर पडलेला दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला. यावेळी पोलिसांसह फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी पुरावे गोळा केले.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह पाहून असे वाटत होते की, हत्येवेळी महिलेने कोणताही विरोध केला नाही. सुरुवातीला मृत महिलेच्या मुलीने पोलिसांना सांगितले की, रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास दोन जण हातात बंदूक घेऊन घरात घुसले. त्या दोघांचेही तोंड झाकलेले होते. त्यांनी घरातील आईचे दागिने व रोख रक्कम लुटून तिला मारहाण करून पळ काढला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या मुलीच्या जबानीत काहीसा विरोधाभास जाणवत होता. त्यामुळे पोलिसांना मुलीवरचा संशय अधिक बळावला. त्यामुळे पोलिसांनी अधिक सखोल चौकशी केली. तेव्हा या चौकशीत मुलीने कबूल केलं की, आपणच आपल्या आईची हत्या केली. कार्तिक चौहान नावाच्या एका व्यक्तीसोबत मिळून तिने आपल्या आईचा गळा चिरून हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं. मात्र, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दरोड्याची खोटी कहाणी तिने रचली होती.