UdayanRaje Bhosale: शिवेंद्रराजेंचा विरोध असतानाही उदयनराजेंची बिनविरोध निवड, असं काय घडलं?
सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांची बिनविरोध निवड झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा उदयनराजे भोसले यांच्या जागेला विरोध होता. मात्र, आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उदयनराजे भोसले यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांनी माघार घेतले आहेत. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवड […]
ADVERTISEMENT

सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांची बिनविरोध निवड झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा उदयनराजे भोसले यांच्या जागेला विरोध होता. मात्र, आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उदयनराजे भोसले यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांनी माघार घेतले आहेत. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहनिर्माणमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर त्यांचेच चुलत बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना विरोध दर्शविला होता. दोघांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. या दरम्यान खासदार उदयनराजे यांनी जिल्हा बँक आणि यातील पदाधिकाऱ्यांवर तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले होते.
यामुळे राष्ट्रवादीमध्ये त्यांच्या विरोधात प्रचंड नाराजी दिसत होती. परंतु दिवाळीनंतर उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या आणि भाजपा तसेच काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केल्यामुळे उदयनराजेंचा जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा मार्ग मोकळा झाला.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात नामदेव सावंत, दादासाहेब बडदरे, ज्ञानेश्वर पवार, जयवंत पाटील, दिलीपसिंह भोसले यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे खासदार उदयनराजे भोसले बिनविरोध निवडून आले यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून घोषणाबाजी करत मोठा जल्लोष केला.