समीर वानखेडेंची संपत्ती नेमकी आहे तरी किती? वाचा ‘मुंबई तक’ चा विशेष रिपोर्ट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान आणि इतर आरोपींना अटक केलेले NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे सध्याच्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत आरोपांची राळ उडवली. तसेच समीर वानखेडेंकडच्या महागड्या वस्तूंवर बोट ठेवत नवाब मलिक यांनी एका प्रामाणिक सरकारी अधिकाऱ्याकडे एवढे संपत्ती येते कुठून असा प्रश्न विचारला होता.

ADVERTISEMENT

प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला दरवर्षी आपली संपत्ती जाहीर करावी लागते. त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वानखेडेंकडे नेमकी संपत्ती आहे तरी किती याचा शोध मुंबई तक ने घेतला आहे.

मुंबईचा उच्चभ्रू परिसर समजला जाणाऱ्या लोखंडवाला परिसरात कामधेनू सोसायटीत वानखेडेंच्या मालकीचे 2 फ्लॅट्स आहेत. यातील एक फ्लॅट पंधराशे स्क्वेअर फीट तर दुसरा 900 स्क्वेअर फीट आहे. समीर वानखेडेंना हे फ्लॅट्स आईच्या बाजूने वारसाहक्कात मिळाले आहेत. समीर वानखेडेंच्या आईने ते IRS अधिकारी होण्याआधीच ही संपत्ती विकत घेतली होती.

हे वाचलं का?

लोखंडवालामधील पंधराशे स्क्वेअर फीटचा फ्लॅट 1999 मध्ये 80 लाखाला खरेदी केला होता. या फ्लॅटमधून वर्षाला 6 लाख 60 हजाराचं उत्पन्न मिळत असल्याचं वानखेडेंनी जाहीर केलंय. या फ्लॅटची आताची किंमत सुद्धा 80 लाख दाखवण्यात आली आहे.

ड्रग्ज केसमध्ये आर्यन खान अडकल्याचं पाहून व्यथित झाले राहुल गांधी, शाहरुख खानला लिहिलं पत्र..

ADVERTISEMENT

कामधेनू अपार्टमेंटमधलाच दुसरा 900 स्केअर फीटचा फ्लॅट वानखेडेंच्या आईंनी 2004 मध्ये घेतला होता, या फ्लॅटमधून वानखेडेंना कोणतंही उत्पन्न मिळत नसल्याचं वानखेडेंनी जाहीर केलंय. या फ्लॅटची आताची किंमत 70 लाख दाखवण्यात आली आहे. समीर वानखेडे यांची बहीण यास्मीन वानखेडे यांच इमारतीच्या परिसरात ऑफीस आहे.

ADVERTISEMENT

लोखंडवालामधीलच रॉयल क्लासिक या एका पॉश इमारतीतही वानखेडेंना आईकडूनच वारसा हक्कात आणखी एक फ्लॅट मिळाला आहे. हा फ्लॅट 615 स्क्वेअर फीटचा आहे. या फ्लॅटच्या मालकीत समीर वानखेडेंसोबतच त्यांची पहिली पत्नी आणि मुलाचाही वाटा आहे. या फ्लॅटची आताची किंमत 80 लाख दाखवण्यात आली आहे. आणि या फ्लॅटमधून वानखेडेंना कोणत्याही प्रकारचं उत्पन्न मिळत असल्याचा उल्लेख नाहीये.

वानखेडेंच्या आईच्या मालकीचं नवी मुंबईतलं हॉटेल सदगुरूही आता समीर आणि त्यांचे वडील डी.के. वानखेडे यांच्या नावावर आहे, म्हणजेच ते समभागीदार आहेत. या हॉटेलपासून 2 लाख 40 हजारांचं उत्पन्न मिळतंय, आणि आताच्या घडीला या हॉटेलची किंमत 1 कोटीच्या घरात आहे. 1995 मध्ये वानखेडेंच्या आईंनी ही संपत्ती विकत घेतली होती.

याशिवाय वाशिम जिल्ह्यातील वारूडमध्ये असलेली 4 एकर शेतजमीनही समीर वानखेडे त्यांची बहीण यास्मिन आणि त्यांच्या वडीलांच्या नावावर आहे. वानखेडेंनी दिलेल्या डिक्लेरेशननुसार यातून त्यांना कोणतंही उत्पन्न मिळत नाहीये, या जमीनीची किंमत 40 लाखाच्या घरात आहे. वानखेडेंनी त्यांच्या कार्यकाळात एकमेव संपत्ती खरेदी केल्याचं त्यांच्या डिक्लेरेशनमध्ये सांगण्यात आलंय. मुंबईतल्याच गोरेगावमध्ये हाय राईज सोसायटीत अकराशे स्केअर फीटचा त्यांचा फ्लॅट आहे, ज्याची किंमत 2.2 कोटीच्या घरात आहे. ही प्रॉपर्टी अजूनही निर्माणाधीन आहे, आणि याचं पूर्ण पेमेंट अद्याप झालेलंही नाही.

समीर वानखेडेंसोबत या फ्लॅटची मालकी त्यांची पत्नी क्रांती वानखेडे आणि वडील डी.के.वानखेडे यांच्याकडेही आहे.

नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांनंतर समीर वानखेडेंची पत्नी क्रांती यांनी समोर येत आपल्या नवऱ्याची बाजू मांडली होती. सध्या समीर वानखेडे यांची ड्रग्ज प्रकरणाती पंच प्रभाकर साईल केलेल्या खंडणीच्या आरोपावरुन चौकशी सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक हा सामना चांगलाच गाजतो आहे. मंत्री मलिक यांनी दिवाळी संपल्यानंतर या प्रकरणात आणखी काही गौप्यस्फोट करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे नेमक्या काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT