भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीत मोठा बदल, नितीन गडकरींना डच्चू तर देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री

मुंबई तक

भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पक्षाच्या संसदीय समितीत डच्चू देण्यात आला आहे, तर देवेंद्र फडणवीसांना संसदीय समितीमध्ये घेण्यात आले आहे. गडकरींशिवाय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही संसदीय समितीतून हटवण्यात आले आहे. हे दोन्ही नेते भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीतूनही बाहेर फेकले गेले आहेत. केंद्रीय […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पक्षाच्या संसदीय समितीत डच्चू देण्यात आला आहे, तर देवेंद्र फडणवीसांना संसदीय समितीमध्ये घेण्यात आले आहे. गडकरींशिवाय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही संसदीय समितीतून हटवण्यात आले आहे. हे दोन्ही नेते भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीतूनही बाहेर फेकले गेले आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांना बोर्डावरुन हटवण्यात आले आहे, तर बीएस येडियुरप्पा, सुधा यादव, इक्बाल सिंग लालपुरा, सर्बानंद सोनोवाल, के. लक्ष्मण यांचा संसदीय समितीत समावेश करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे नितीन गडकरींना काढून देवेंद्र फडणवीसांना संधी दिल्याबद्दल राज्यात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

हे आहेत नवीन संसदीय समितीचे सदस्य

जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष)

नरेंद्र मोदी

हे वाचलं का?

    follow whatsapp