राज्यपालांच्या बोलण्याचे वेगळे अर्थ काढण्यात आले : वादावर फडणवीस आणखी काय म्हणाले?
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्याविरोधातील वातावरण तापलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून महाराष्ट्राच्या विविध भागात राज्यपाल कोश्यारी आणि त्रिवेंदींविरोधात आंदोलन केलं जातं आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आहेत, होते आणि अनेक पिढ्यांचे आदर्श […]
ADVERTISEMENT

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्याविरोधातील वातावरण तापलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून महाराष्ट्राच्या विविध भागात राज्यपाल कोश्यारी आणि त्रिवेंदींविरोधात आंदोलन केलं जातं आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आहेत, होते आणि अनेक पिढ्यांचे आदर्श राहतील. त्यांची बरोबरी, त्यांची तुलना या देशामध्ये आणि राज्यामध्ये होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
बावनकुळेंसोबतच आता या वादावर उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ७१ व्या ऑल इंडिया पोलीस रेसलिंग क्लस्टर चॅम्पियनशिपचा समारोप कार्यक्रम आज पुण्यात पार पडला. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
फडणवीस म्हणाले, एक गोष्ट स्पष्ट आहे, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य, या पृथ्वीवर आहे. तो पर्यंत महाराष्ट्राचे, देशाचे आणि आमच्या सगळ्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हेच राहणार आहेत. आजच्या भाषेत सांगायच झालं तर छत्रपती शिवाजी महाराजाच हिरो आहेत. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. राज्यपालांच्या मनात देखील काही शंका नाही.
राज्यपालांच्या बोलण्याचे निश्चितच वेगवेगळे अर्थ काढण्यात आले. मला एक वाटतं की, त्यांच्या मनात असे कोणतेही भाव नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरा कुठला आदर्श देशात आणि महाराष्ट्रात असू शकत नाही, अशीही भूमिका त्यांनी मांडली.