मलिकांच्या इशाऱ्यांनंतर फडणवीसांच्या ट्विटची चर्चा; म्हणाले, डुकराशी कुस्ती…
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणावरून सुरू झालेले आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आता अंडरवर्ल्डपर्यंत पोहोचल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज (10 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबद्दल मोठं विधान केलं. मुख्यमंत्री (Chief Minister Of Maharashtra) असताना फडणवीसांनी अंडरवर्ल्डच्या मदतीने शहराला कशाप्रकारे ओलीस ठेवलं हे उघडं करणार असल्याचं […]
ADVERTISEMENT

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणावरून सुरू झालेले आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आता अंडरवर्ल्डपर्यंत पोहोचल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज (10 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबद्दल मोठं विधान केलं. मुख्यमंत्री (Chief Minister Of Maharashtra) असताना फडणवीसांनी अंडरवर्ल्डच्या मदतीने शहराला कशाप्रकारे ओलीस ठेवलं हे उघडं करणार असल्याचं मलिक म्हणाले. मलिकांच्या या विधानानंतर देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं एक ट्वीट चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. (Devendra fadnavis new tweet)
नवाब मलिक यांच्या खळबळजनक आरोपांनंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी फार आधीच शिकलोय’ असं ट्विट केलं आहे. देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेऊन मलिकांना काय उत्तर देणार, याकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं असतानाच फडणवीसांनी हे ट्विट केलं.
मलिक विरुद्ध फडणवीस : ‘त्यांचं एकच लक्ष्य आहे’; अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांवर ‘ट्वीट’ हल्ला
देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं हे ट्विट म्हणजे जगप्रसिद्ध इंग्रजी लेखक जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या पुस्तकातील एक कोट आहे. ‘मी फार आधीच शिकलोय की, डुकराशी कुस्ती खेळायची नसते. अशी कुस्ती खेळून तुम्ही स्वतः तर घाणीने माखून जाताच, पण यात डुकरालाच मजा येत असते.’