अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी फडणवीसांनी दिला एक लाखाचा निधी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणाच्या अनुषंगाने सुरु असलेल्या देशव्यापी निधी समर्पण मोहिमेत आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनीही सहभाग घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मंदिर निर्माणाच्या निधीसाठी एक लाख एक रुपयांचा निधी दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या एका छोट्या कार्यक्रमा त्यांनी हा एक लाख एक रुपयाचा धनादेश श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरीजी महाराज यांना दिला. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून या मोहिमेची सुरुवात झाली.

ADVERTISEMENT

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन निधी गोळा करण्याचे काम सुरु आहे. 27 फेब्रुवारीपासून ही मोहीम देशभरात सुरु करण्यात येणार आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

हे वाचलं का?

“प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर अयोध्येत साकारले जाते आहे. ही आपल्या सगळ्यांसाठी स्वप्नपूर्तीच आहे. या राष्ट्रीय कार्यात एक कारसेवक म्हणून मझा खारीचा वाटा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्याकडे समर्पित करता आला, हे माझे भाग्य. आपण आपले योगदान द्या.“

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT