Dhananjay Munde Profile : फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील पहिली विकेट, कोण आहेत धनंजय मुंडे? A टू Z कारकीर्द
Dhananjay Munde:धनंजय मुंडेंचा नीकटवर्तीय वाल्मिकला आरोपपत्रात मास्टरमाईंड करण्यात आलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव येत होता. मात्र, तेव्हाही धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नाही. अखेर संतोष देशमुख यांना मारतानाचे फोटो व्हायरल झाले आणि महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. त्यानतंर आज 3 मार्च 2024 ला धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

2012 मध्ये गोपीनाथ मुंडेंची साथ सोडली

2019 मध्ये पंकजा मुंडेंना पराभूत केलं

करूणा मुंडे, कृषी साहित्य घोटाळा ते बीड प्रकरण...

धनंजय मुंडे यांची संपूर्ण कारकीर्द वाचा सविस्तर...
Who is Dhananjay Munde : दोन महिन्यांपूर्वी 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. राज्यभरात मोर्चे, आंदोलनांच्या माध्यमातून न्याय मागण्यात आला. दोन महिने चाललेल्या संघर्षानंतर संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी केलेल्या क्रूरतेची दृष्य काल 3 मार्चला समोर आली आणि महाराष्ट्र संतापला. या संपूर्ण वातावरणानंतर अखेर 4 मार्चला सकाळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांनी आपल्याकडे राजीनामा दिल्याचं सांगितलं. तसंच हा राजीनामा आपण स्वीकारला असून, हा राजीनामा राज्यपालांकडून सोपवला आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. (Dhananjay Munde Political Journey)
धनंजय मुंडे यांच्या कारकीर्दीची सुरुवात...
स्वर्गीय भाजप नेते गोपीनाथ मुंडे हे आपल्या राजकीय कारकीर्दीच्या मध्यावधीमध्ये असताना धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री असताना, धनंजय मुंडे हे काही वादांचे कारण ठरले होते. त्यानंतर बीडमध्ये गोपीनाथ यांच्या कन्या पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार म्हणून उदयास आल्यानंतर, धनंजय मुंडे यांनी आपली वेगळी चूल मांडायचं ठरवलं. 2009 ला पंकजा मुंडेंना तिकीट मिळाल्यापासूनच धनंजय मुंडे हे भाजपमध्ये नाराज होते.
गोपीनाथ मुंडेंची साथ सोडली...
काका गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडून धनंजय मुंडे यांनी 2012 ला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. शरद पवार, अजित पवार यांच्या नेतृत्वात धनंजय मुंडे यांनी काम सुरू केलं. त्यानंतर धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची जबाबदारी देण्यात आली. डिसेंबर 2014 ते ऑक्टोबर 2019 पर्यंत धनंजय मुंडे हे विधान परिषद सदस्य होते. विधान परिषदेत त्यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं होतं, ते त्यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत चांगलंच गाजवलं होतं.
हे ही वाचा >>तीन महिन्यातील सर्वात मोठी बातमी, CM फडणवीसांनी कॅमेऱ्यासमोर येऊन केली घोषणा.. सरकारला हादरा
पंकजा मुंडेंचा पराभव केला...
2019 ची विधानसभा निवडणूक परळीसाठी आणि एकूणच बीडचं सत्ताकेंद्र ज्यांच्या कुटुंबात होतं, त्या मुंडे कुटुंबासाठी ऐतिहासिक होती. या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे आणि भाजपकडून पंकजा मुंडे मैदानात होत्या. या लढतीमध्ये धनंजय मुंडे यांचा विजय झाला आणि त्यांची राजकीय घोडदौड सुरू झाली.