तीन महिन्यातील सर्वात मोठी बातमी, CM फडणवीसांनी कॅमेऱ्यासमोर येऊन केली घोषणा.. सरकारला हादरा
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची घोषणा स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या सगळ्या प्रकरणावरून सरकारवर बरीच टीका होत होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला

स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

नव्या सरकारच्या पहिल्या तीन महिन्यातच पहिला बळी
Dhananjay Munde Resignation: मुंबई: राज्यातील फडणवीस सरकारला पहिल्या तीन महिन्यातच सगळ्यात मोठा धक्का बसला आहे. राज्यात सरकार सत्तेत आल्याच्या काही दिवसात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली होती. तेव्हापासूनच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात होती. अखेर काल (3 मार्च) संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड गदारोळ झाला. ज्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांवर दबाव वाढला. ज्यानंतर अखेर आज (4 मार्च) धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. ज्याबाबत स्वत: मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत घोषणा केली आहे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची CM फडणवीसांकडून घोषणा
संतोष देशमुख यांच्या अत्यंत क्रूर हत्येचे जे फोटो समोर आले तेव्हापासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला होता. याचबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी आज माध्यमांसमोर येऊन माहिती दिली.
हे ही वाचा>> Dhananjay Munde Resigns : अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा, रात्री उशिरा झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली होती?
'राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाईकरिता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून त्यांना मुक्त करण्यात आलं आहे.' एवढीची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावर अधिक काही बोलण्यास फडणवीसांनी नकार दिला.
अजित पवार काय म्हणाले?
दरम्यान, याच प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी अत्यंत मोघम अशी प्रतिक्रिया दिली. 'राजीनामा झालेला आहे. त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिलेला आहे.' एवढीच त्रोटक प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी दिली.