कुत्र्यांचे लाड घरी करा, त्यांना गादीवर झोपवा; तळजाई उद्घाटनादरम्यान अजितदादांची टोलेबाजी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात तळजाई वनउद्यानाच्या प्रवेशद्वाराचं उद्घाटन केलं. अजितदादांच्या या कार्यक्रमामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झालेली पहायला मिळाली. अजितदादा यावेळी उद्घाटनापुरतेच थांबले नाहीतर तर त्यांनी तळजाई उद्यानात लांबलचक रपेटही मारली. यावेळी अजितदादांनी या उद्यानातील अधिकाऱ्यांना सूचना देताना तळजाई टेकडीवर होणाऱ्या घाणीवरुन पुणेकरांनाही टोले लगावले आहेत.

ADVERTISEMENT

पुणेकरांनी तळजाईवर पाळीव कुत्रे आणू नयेत. तुम्हाला कुत्र्यांचे जे काही लाड करायचे आहेत ते घरी करा, हवंतर गादीवर झोपवा पण इथे तळजाईवर नको असं म्हणज अजितदादांनी पुणेकरांना शालजोडीतले लगावले आहेत.

“मी तळजाईकडे येताना बघितलं लोक रस्त्यावरच कचरा टाकतात हे बरं नाही. भटकी कुत्री तळजाईवर येतात, काही लोक पाळीव कुत्री पण फिरायला घेऊन येतात, हे थांबलं पाहिजे. तळजाईवरचे ससे आणि मोर हे कुत्रे खातात, या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. तळजाईवर वनोद्यानाचं सौंदर्य टिकलं पाहिजे, इथली झाडं जगवण्यासाठी टेकडीवर पाइपलाईन टाकावी लागेल, त्यासाठी मी निधी देतो. इथलं फुलपाखरू उद्यान बहरलं पाहिजे. तळजाईमुळे पुणेकरांना ऑक्सिजन मिळतोय, म्हणजे हे वनउद्यान टिकलं पाहिजे”.

हे वाचलं का?

बिबट्यासारखा दिसणारा कुत्रा पाहून लोक झाले आवाक, सोशल मीडियावर तुफान चर्चा

यावेळी अजितदादांनी काही पुणेकरांच्या आडमुठ्या भूमिकेवरही टीका केली. तळजाईवर १ रुपया पार्किंगचा चार्ज लावला तरीही पुणेकर ओरडतात, काही पठ्ठे तर थेट कोर्टात जातात. पुणेकरांचा स्वभाव आपल्या सर्वांना माहिती आहे. अरे कोर्टात जाण्याआधी आधी चर्चेला तर या, सरकारी चर्चेतून मार्ग काढता येतो असं अजित पवारांनी आजच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान पुणेकरांना सुनावलं.

ADVERTISEMENT

नवाब मलिक यांच्या अटकेच्या कारवाईवर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT