Video : जमिनीवर गडबडा लोळली… नवरीचा पोलिस ठाण्यात तुफान राडा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Do Shaadi karenge do Shaadi married woman video viral
Do Shaadi karenge do Shaadi married woman video viral
social share
google news

Do Shaadi karenge do Shaadi : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एका लग्न झालेल्या महिलेने पोलीस ठाण्यात धिंगाणा घातला आहे. दुसरे लग्न करण्यासाठी महिलेने संपुर्ण पोलिस (Police) स्टेशन डोक्यावर घेतले होते. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. (do shaadi karenge do shaadi video bride demands marriage with lover up news)

व्हायरल व्हिडिओत असलेल्या महिलेचे पहिले लग्न झालेले आहे. 18 फेब्रुवारी 2022 रोजी बसेला गावातील रहिवाशी अनिल शर्मासोबत तिने लग्न केले होते. मात्र या लग्नापासून ती फारशी अशी खुश नव्हती.त्यामुळे तिला बॉयफ्रेंड गुड्डूसोब लग्न करायचे होते. यासाठी तिने पोलिस स्टेशन देखील गाठलं होतं. या दरम्यान तिने दुसऱ्या लग्नासाठी (second marriage) पोलिस ठाण्यात धिंगाना घातला होता. या धिंगाण्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

व्हायरल व्हिडिओत काय?

एक लग्न झालेली महिला बॉयफ्रेंडसोबत (Boyfriend) लग्न करण्यासाठीचा अर्ज घेऊन पोलीस स्टेशन पोहोचते. या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून ती धिंगाणा घालते. महिला पोलीस स्टेशन बाहेर ‘दोन लग्न करायचे आहेत’, ‘दोन लग्न करायचे आहेत’,अशी घोषणाबाजी देते.त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून मोबाईल आपटते.पोलीस ठाण्याच्या जमीनीवर लोळत बसते. ही महिला संपुर्ण पोलीस स्टेशनच डोक्यावर घेते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : लग्नात नवरीने लाजच काढली…भरमंडपात कुटूंबियांसह नातेवाईकांनी मान शरमेने खाली

दरम्यान या महिलेला आवरण्यासाठी दोन महिला कॉस्टेबलही (Women Constable) प्रयत्न करतात. मात्र त्यांच्याशी देखील ती हातापाई करते. मोबईल आपटते, जमीनीवर लोळत बसते. त्यानंतर कॉस्टेबल तिला पकडून कॅबिनमध्ये नेतात आणि तिला शांत करतात. महिलेचे मानसिक संतुलन ठीक नाही आहे. महिलेला डॉक्टरांना दाखवण्याचा सल्ला देत, सासरवाडीकडे सुपुर्द केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

दीपिका भारद्वाज या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. दोन लग्न करायचंय, दोन लग्न, एक लग्न झालेली महिला बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्याची मागणी करतेय. पोलीस ही घटना मुक होऊन पाहत आहेत. हिच्या नवऱ्यासाठी खुप वाईट वाटतेय, अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. दरम्यान हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : वासनांध बायकोचं नवऱ्यासोबत भयंकर कृत्य.. नेमकं घडलं तरी काय?

उत्तर प्रदेशच्या हमीरपुर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT