रूपेरी पडद्यावर तीन डॉन साकारणारा कलाकार कोण आहे माहित आहे का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई! मुंबई हे शहर म्हणजे मायानगरी. पण याच मायानगरीची ओळख आहे ती म्हणजे तिच्या रूपेरी आणि गडद अशा दोन्ही छटांमुळे. मुंबईत एकीकडे टोलेजंग इमारती, उंची कार, रेसकोर्स असं श्रीमंती दाखवते. दुसरीकडे झोपडपट्टी, गटारं, पावसाळ्यात तुंबणारं पाणी हेदेखील याच मुंबईचं एक रूप आहे.

ADVERTISEMENT

अंडरवर्ल्ड हा शब्दही मुंबईशीच जोडला गेला आहे. मुंबईत गुन्हेगारी आताही होते आहे, पूर्वीही होत होती. तिचं स्वरूप फक्त बदलत गेलं. तीन डॉन होऊन गेले ज्यांच्या गुन्हेगारी आयुष्याची सुरूवात इथेच झाली. पहिला होता.. करीमलाला. दुसरा होता हाजी मस्तान आणि तिसरा आहे पण मुंबईत नाही कराचीत… त्याचं नाव दाऊद.

करीमलाला आणि हाजी मस्तान या दोघांचाही मृत्यू झाला आहे. दाऊद पाकिस्तानात जाऊन लपलाय. भारतातला नंबर एकचा मोस्ट वॉटेंड डॉन तो आहे. हे तिघे त्यांनी केलेल्या कारवाया आणि त्यांचं आयुष्य यावर सिनेमा निघाला नसता तरच नवल. संजय लीला भन्साळी गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा घेऊन आला आहे. 25 फेब्रुवारीला रिलिज झालेल्या या सिनेमाला चांगला प्रतिसादही मिळतो आहे. यात उल्लेख आहे तो करीमलालाचा. या करीमलालानेच गंगुबाईला बहीण मानलं होतं. त्यामुळे गंगुबाई कामाठीपुरामधली लेडी डॉन झाली.

हे वाचलं का?

मुंबईतला पहिला डॉन म्हणून करीमलाला ओळखला जातो. त्याने मुंबईत कुंटणखाने सुरू केले. जुगाराचे अड्डे, दागिने, सोनं या सगळ्याची तस्करीही केली. मात्र पुढे त्याचं वर्चस्व संपुष्टात आलं. शेवटी तो वार्धक्याने थकून त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी तीन दिवस त्याच्या मृत्यूची बातमीही समोर आली नव्हती. दुसरं नाव आहे ते हाजी मस्तानचं. हाजी मस्तान 1960 ते 80 च्या दशकात मुंबईतल्या गुन्हेगारी विश्वात त्याचा दबदबा होता. त्यानंतर आला तो दाऊद. दाऊदनेही तस्करी, स्मगलिंग, खंडणी, हत्या असे अनेक गुन्हे केले. 1993 च्या मुंबईतल्या साखळी स्फोटांतला तो मुख्य आरोपी आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

गंगुबाई सिनेमात अजय देवगण करीमलालाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या सिनेमात त्याचं नाव रहीम खान असं आहे. हे पात्र थेट करीमलालाशी मिळतंजुळतं आहे. त्याच्या वेशभूषेवरून हे स्पष्ट झालं आहे. अजयने ही भूमिका साकारल्याने त्याच्या नावावर मुंबईतल्या तिन्ही कुख्यात डॉनच्या भूमिका झाल्या आहेत. करीमलालाची भूमिका त्याने 25 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या गंगुबाई काठियावाडी सिनेमात साकारली आहे. अजय देवगणच्या या भूमिकेचंही कौतुक होताना दिसतं आहे.

अजय देवगणने साकारलेल्या डॉनची भूमिका साकारलेला पहिला सिनेमा होता कंपनी. कंपनी हा सिनेमा 2002 मध्ये आला होता. रामगोपाल वर्माने हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. या सिनेमात मलिक नावाचं पात्र अजय देवगणने साकारलं होतं. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्यात गँगवॉर कसं झालं. दाऊद देशाबाहेर कसा पळाला. त्या सगळ्यावर हा सिनेमा बेतलेला होता. या सिनेमातल्या सगळ्या घटना खऱ्या नव्हत्या. मात्र वास्तवाशी साधर्म्य साधणाऱ्या होत्या. सत्या सिनेमा इतका हा सिनेमा व्यावसायिक दृष्ट्या चालला नाही. मात्र समीक्षकांनी गौरवला. या सिनेमात अजय देवगणने साकारलेला मलिक पाहणं म्हणजे आजही पर्वणी आहे. थंड डोक्याने वावरणारा, अंडरवर्ल्डमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण करणारा, निर्दयी मलिक अजय देवगणने खूप खुबीने साकारला आहे.

दुसरा सिनेमा होता वन्स अपॉन टाइम इन मुंबई. हा सिनेमाही वास्तवात घडलेल्या घटनांवर आधारीत होता. हाजी मस्तानभोवती हा सिनेमा फिरतो. हाजी मस्तान या डॉनवर आधारीत हा सिनेमा होता. यात अजय देवगणने सुलतान मिर्झा हे पात्र साकारलं होतं. पांढरे कपडे, पायात बूट, डोळ्याला गॉगल लावून फिरणारा स्टायलिश सुलतान मिर्झा अजय देवगणने पडद्यावर खूप प्रामाणिकपणे साकारला. या सिनेमातले अनेक प्रसंग आजही लोकांच्या स्मरणात आहेत. खासकरून सुलतान मिर्झा जेव्हा एका नेत्यासाठी गाडीवर चढून लोकांना शांत राहण्याचं आवाहन करतो तो प्रसंग. हा सिनेमा मिलन लुथ्रियाने दिग्दर्शित केला होता. यातला इम्रान हाश्मीने साकारलेला शोएब हा थेट दाऊदसारखाच होता. हाजी मस्तान आणि दाऊद यांच्यातली मैत्री आणि नंतर झालेली दुश्मनी यासारखे काही प्रसंग यात होते.

खरंतर अमिताभ बच्चन यांनी साकारलेला दिवार यातलं विजय हे कॅरेक्टरदेखील हाजी मस्तानवर बेतलेलं होतं असं म्हणतात. पण दिवार सिनेमाचा प्लॉट वेगळा होता. एक भाऊ स्मगलर, एक भाऊ पोलीस त्यांचं आईशी असलेलं नातं. दिवारची जबरदस्त पटकथा आणि डायलॉग्ज हे त्यातले विशेष होते. अमिताभ यांनी साकारलेला विजय आणि शशी कपूर यांनी साकारलेला रवि दोन्ही प्रेक्षकांना भावले. सिनेमाची कथा लिहिली होती सलीम जावेद यांनी. तर सिनेमा दिग्दर्शित केला होता यश चोप्रांनी. यात अमिताभ यांनी जी व्यक्तिरेखा साकारली आहे तो विजय सुरूवातीला पोर्टवर हमाल म्हणून काम करत असतो असं दाखवण्यात आलं होतं. त्याचा बिल्ला नंबर होता 786 हाच बिल्ला नंबर हाजी मस्तान यांचाही होता असं म्हणतात. त्यामुळे विजयचं पात्र हाजी मस्तानवरून घेतलं आहे अशी चर्चा त्यावेळी झाली होती.

आता गंगुबाई काठियावाडी सिनेमात अजय देवगण हाजी मस्तानची म्हणजेच रहिम खानची भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेचं कौतुक होतं आहे. त्याचप्रमाणे आलियाने साकारलेली गंगुबाईही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शन हेच सांगून गेलं आहे. मुंबईची काळी बाजू ज्यांच्यामुळे ओळखली गेली त्या तिन्ही डॉनच्या व्यक्तिरेखा साकारणारा अजय देवगण हा बहुदा पहिलाच कलाकार ठरला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT