आर्यन खानच ड्रग्ज प्रकरणच नव्हे तर आत्तापर्यंत ‘या’ वादांमध्येही अडकलाय शाहरुख खान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अभिनेता शाहरुख खान हा सध्या चर्चेत आहे. याचं कारण आहे त्याचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकला होता. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानच्या मुलाला अटक केली. त्यानंतर तो पंचवीस दिवस तुरुंगात होता. त्यामुळे गेले पंचवीस दिवस आर्यन खान आणि ड्रग्ज प्रकरण याचीही उलटसुलट चर्चा झाली.

ADVERTISEMENT

गौरी खानचा वाढदिवस आणि शाहरुख गौरीच्या लग्नाचा वाढदिवस या दोन दिवशीही आर्यन घरी येऊ शकला नाही. आता आज शाहरुखचा वाढदिवस आहे त्यात आनंदाची बातमी ही आहे की आर्यन खानची सुटका झाली आहे. आर्यन खानला मागच्या गुरूवारी जामीन मंजूर झाला. त्यानंतर तो शनिवारी त्याच्या घरी गेला. आज शाहरुखचा वाढदिवस असल्याने शाहरुख तो वाढदिवस नक्कीच आनंदात साजरा करणार यात शंका नाही. मात्र आर्यन खानमुळे जो वाद निर्माण झाला त्यात शाहरुख खानचा मुलगा ही त्याची ओळख होती म्हणूनच. अर्थात शाहरुख खानचं आणि वादांचं नातं जुनं आहे.. आपण आज जाणून घेणार आहोत त्याचबद्दल.

हे वाचलं का?

फराह खानच्या पतीला मारली होती कानशिलात?

ADVERTISEMENT

फराह खानच्या पतीला म्हणजेच शिरीष कुंदेरला शाहरुखने कानाखाली वाजवली होती अशी चर्चा झाली होती. हे कथित प्रकरण तेव्हा समोर आलं होतं आणि बराच वाद आणि चर्चाही झाली होती. त्यावेळी जे वृत्त समोर आलं त्यानुसार अभिनेता संजय दत्तने अग्निपथ सिनेमाची सक्सेस पार्टी दिली होती. त्यावेळी शिरीष कुंदेर काहीतरी बोलून गेला होता. जे शाहरुखला मुळीच आवडलं नाही त्याचा पारा चढला आणि त्याने शिरीषच्या कानशिलात लगावून दिली. अर्थात या संपूर्ण प्रकरणात ना शाहरुखने कधी समोर येऊन प्रतिक्रिया दिली ना शिरीषने.. त्यामुळे हे प्रकरण गुलदस्त्यातच राहिली. मात्र या दोघांमधल्या या वादाची चर्चा चांगलीच चघळली गेली होती.

ADVERTISEMENT

पाकिस्तानचा एजंट म्हटलं गेलं

शाहरुखच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याने एक वक्तव्य केलं होतं. त्यामध्ये तो असं म्हणाल होता की जी तरूण पिढीने धर्माच्या नावाखाली माथी भडकवणाऱ्यांपासून दूर राहिलं पाहिजे. त्याचं हे वक्तव्य असहिष्णुतेशी जोडलं गेलं. भाजपच्या नेत्यांनी तर त्याच्यावर पाकिस्तानचा एजंट असल्याचेही आरोप केले होते. तसंच शाहरुख खानने देश सोडून पाकिस्तानात जावं असंही म्हटलं होतं. ज्यानंतर कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याने शाहरुखला पाकिस्तानात येण्याचं खुलं निमंत्रणही दिलं होतं. यानंतरही शाहरुखवर बरेच आरोप झाले होते. तसंच त्याला भारतातलं वातावरण असहिष्णू वाटत असेल तर त्याने खुशाल पाकिस्तानात जावं असाही सल्ला त्याला अनेक नेत्यांनी त्यावेळी दिला होता.

वानखेडे मैदानावर शाहरुखचा राडा, घालण्यात आली होती बंदी –

शाहरुख खानकडे कोलकाता नाईट रायडर्स संघाची सहमालकी आहे. आयपीएल २०१२ दरम्यान सामना संपल्यानंतर शाहरुख खानचा वानखेडे मैदानावरच्या सुरक्षा रक्षकाशी वाद झाला होता. MCA ने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार हा वाद झाला त्यावेळी शाहरुख दारुच्या नशेत होता आणि त्याने MCA च्या सुरक्षारक्षकाला शिवीगाळ केली.

या प्रकारानंतर शाहरुख खानने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, MCA चा सदर कर्मचारी आपल्या मुलीसोबत चुकीच्या पद्धतीने वागत होता. KKR च्या सेलिब्रेशनदरम्यान हा वाद घडला होता. त्यावेळी एका बापाला जे करणं गरजेचं होतं तेच मी केलं असं स्पष्टीकरण शाहरुखने दिलं. MCA च्या सुरक्षारक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखने त्या प्रसंगादरम्यान शिवीगाळ केल्यामुळे हा वाद वाढला. प्रसारमाध्यमांमध्ये हे प्रकरण आल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शाहरुखविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ज्यानंतर MCA ने शाहरुखवर कारवाई करत त्याला वानखेडे मैदानात प्रवेश करण्यासाठी ५ वर्षांची बंदी घातली. या प्रकरणातून आपलं नाव क्लिअर करण्यासाठी शाहरुखला किमान एक दशकाची वाट पहावी लागली.

My Name is Khan सिनेमाचा वाद

ऑगस्ट 2009 मध्ये शाहरुख खानला न्यूजर्सी विमानतळावर अडवण्यात आलं. त्याचं आडनाव खान असल्याने त्याला ताब्यातही घेण्यात आलं होतं. शाहरुख खान त्यावेळी साऊथ एशियन इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता. तो त्या कार्यक्रमात गेस्ट ऑफ ऑनर होता. त्याला जेव्हा अडवण्यात आलं तेव्हा काँग्रेस खासदार राजीव शुक्ला यांनी यूएसच्या अधिकाऱ्यांशी बोलणं केलं. ज्यानंतर शाहरुखला सोडण्यात आलं. शाहरुखच्या माय नेम इज खान सिनेमावर शिवसेनेनेही आक्षेप घेतला होता. या सिनेमाचा एक स्पेशल शो पार पडला त्यात काही खटकण्यासारखं नाही हे लक्षात आल्यानंतर तो सिनेमा रिलिज झाला होता.

प्रियंका चोप्रासोबत जोडलं गेलं नाव

गौरी खानवर आपलं किती प्रेम आहे हे शाहरुख वारंवार सांगताना दिसला आहे. मात्र त्याचं नाव पिगी चॉप्स अर्थात प्रियंका चोप्रासोबतही जोडण्यात आलं होतं. यावरून गौरी आणि शाहरुख यांच्यात वाद झाल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. ही पहिलीच वेळ होती जेव्हा शाहरुखचं नाव त्याच्या को स्टार सोबत जोडलं गेलं होतं. शाहरुख खानने याबाबत कधीही मौन सोडलं नाही. तसंच प्रियंका चोप्रानेही याबाबत कधीच थेट प्रतिक्रिया दिली नाही. त्या काळात झालेल्या एका आयपीएल मॅचला आर्यन, सुहाना आणि शाहरुख हे तिघेच आले होते. गौरी आली नव्हती. प्रियंका चोप्रामुळे या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्याही चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. हळूहळू हे सगळं प्रकरण लोक विसरून गेले.

गर्भलिंग निदान केल्याचा आरोप

शाहरुख खान आणि गौरी यांनी तिसरं मूल प्लान केलं होतं. हे मूल सरोगसीच्या माध्यमातून होणार होतं हे जाहीर करण्यात आलं होतं. मात्र या मुलासाठी शाहरुखने गर्भलिंग निदान चाचणी केल्याचा आरोप त्याच्यावर झाला होता. शाहरुख खानने मात्र ही गोष्ट कधीही स्वीकारली नाही. त्याने अफवांवर विश्वास ठेवू नका हेच सांगितलं.

इतके सगळे आरोप झाले तरीही तो त्यातून सुटला किंवा त्या सगळ्यातून बाहेर आला. शाहरुख खानला किंग खान असं म्हटलं जातं. तो गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपलं सगळ्यांचं मनोरंजन करतो आहे. एक काळ असा होता ज्या काळात नंबर्सची स्पर्धा तारे-तारकांमध्ये नव्हती. त्या काळात दिलीप कुमार, राज कपूर आणि देवआनंद हे सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकांशी दैवत होते. त्यानंतर मधला काळ गाजवला तो राजेश खन्ना, अमिताभ यांनी. मात्र तिघांची त्रयी भेटीला आली ती साधारण ९० च्या दशकात. आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान. या तिघांमध्ये शाहरुखचा फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. सलमान खानच्या आयुष्यातही अनेक वाद झाले. आमिर खान मात्र या सगळ्यापासून दूर राहिला. शाहरुखचं विशेष हे आहे की तो वादांमध्ये अडकलाही आणि बाहेरही आला ही गोष्ट विशेष आहे असंच म्हणावं लागेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT