ठाकरे सरकार आणि भगतसिंह कोश्यारी यांच्यात विस्तव का जात नाही?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन वर्ष कालावधी लोटला आहे. हा प्रयोग यशस्वी होईल की नाही अशी चर्चा करणाऱ्यांना उत्तर मिळालं आहे. मात्र या सरकारसोबतच महाराष्ट्रात आणखी एक नाव कायमच चर्चेत राहिलं आहे आणि ते नाव आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. ठाकरे सरकार आणि भगतसिंह कोश्यारी यांच्यातून विस्तवही जात नाही हे महाराष्ट्रानं गेल्या वर्षभरात अनेकदा पाहिलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमान प्रवास नाकारल्याची जी बातमी आली त्यानंतर या मतभेदांची पुन्हा एकदा चर्चा होते आहे. आपण आता जाणून घेणार आहोत राज्यपाल विरूद्ध ठाकरे सरकार असं किती वेळा घडलंय?

ADVERTISEMENT

कशी झाली संघर्षाची सुरूवात?

हे वाचलं का?

काँग्रेसचे नेते के.सी. पडवी हे मंत्री म्हणून शपथ घेत होते. त्यावेळी त्यांनी शपथ घेताना काही ओळी आपल्या मनाने जोडल्या. यावरून राज्यपाल भगत सिंह हे पडवी यांच्यावर चिडले होते. मी सांगतो आहे त्याच भाषेत आणि तेवढीच शपथ घ्यायची आहे. आपल्या मनाची वाक्य शपथेत घ्यायची नाही असं म्हणत राज्यपालांनी के.सी. पडवी यांना झापलं होतं. एवढंच नाही तर त्यांना शपथ पुन्हा वाचायला लावली होती. हीच सरकार आणि राज्यपाल असा संघर्ष रंगणार याची सुरूवात होती

पुढे काय काय घडलं?

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री जाल्यानंतर त्यांना विधानसभा किंवा विधानपरिषद या दोन सभागृहांपैकी एका ठिकाणी सहा महिन्यांच्या आत निवडून येणं हे संविधानिकदृष्ट्या अनिवार्य होतं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांची नियुक्ती रखडवली होती आणि राज्यातील अनिश्चितता संपुष्टात आणण्याचं कारण सांगत निवडणूक आयोगाला पत्रही पाठवलं होतं.

ADVERTISEMENT

ठाकरे सरकारने शिफारस केलेल्या राज्यपाल कोट्यातील विधानपरिषदेतील बारा आमदारांची नियुक्ती अजूनही रखडलेलीच आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी नोव्हेंबर महिन्यातच चार सदस्यांच्या नावाची शिफारस केली होती मात्र अद्यापही राज्यपालांनी यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

संजय राऊत आक्रमक

राज्यपालांना पंधरा मिनिटं विमानात बसून परतावं लागलं हा त्यांना त्यांचा अपमान वाटला, मग आम्ही इतक्या दिवसांपासून राज्यपालांना आमदारांची यादी दिली आहे ज्यांची निवड करणं हे दहा मिनिटांचं कामही नाही, अशात आमचा अपमान कुणी केला असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले आहेत?

लॉकडाऊनच्या काळात मंदिरं उघडण्यावरून मुख्यमंत्र्यांना पत्र कोरोना असल्याने राज्यसह देशभरात लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यानंतर अनलॉकमध्ये काही गोष्टी काही प्रमाणात अटी शर्थींसह सुरू झाल्या. त्यानंतर भाजपने ठाकरे सरकार मंदिरं का उघडत नाही? असा प्रश्न विचारत आंदोलन केलं होतं. त्यावेळीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून हिंदुत्वाची आठवण केली होती. ज्यानंतर सामनामध्ये अग्रलेख लिहून शिवसेनेने राज्यपालांवर टीका केली होती.

जाणून घ्या भगतसिंह कोश्यारी राज्यपाल कोश्यारी वादग्रस्त होते का?

कंगनाला समर्थन, पवारांची टीका

अभिनेत्री कंगना रणौतने सप्टेंबर महिन्यात मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. तसंच ठाकरे सरकारलाही ट्विटमधून नावं ठेवली होती. यानंतर कंगना राज्यपालांनाही जाऊन भेटली होती. ज्यावरूनही सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांनी राज्यपालांवर टीका केली होती. एवढंच नाही तर जानेवारी महिन्यात जेव्हा शरद पवार हे शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या मुंबईतल्या आंदोलनात पोहचले होते तेव्हाही त्यांनी कंगनाला भेटायला राज्यपालांना वेळ आहे पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला नाही असं म्हणत त्यांच्या गोवा दौऱ्यावर आरोप केला होता. तेव्हाही महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल असा सामना बघण्यास मिळाला.

पाहा मुंबई तकचा खास व्हिडीओ

कविता राऊतच्या नोकरीवरून टीका

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतला राज्य सरकार आणि क्रीडा मंत्री सुनील केदार नोकरी देऊ शकत नसतील तर काहीतरी गडबड आहे असं वक्तव्य करत काही दिवसांपूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती.

गेल्या वर्षभरात घडलेल्या या ठळक घटना लक्षात घेतल्या तर राज्यपालांना नाकारण्यात आलेला विमान प्रवास हे राज्यपालांना दिलेलं एक प्रकारचं उत्तरच होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या सगळ्या घटना लक्षात घेतल्या तर राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यात विस्तव जात नाही हेच खरं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT